मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील जुगाराचा अड्डा बंद कधी होणार ??
मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील जुगाराचा अड्डा बंद कधी होणार ??
मुंबईतील वरळी कोळीवाड्यात जुगार, सट्टेबाजी आणि कटिंगचे अवैध व्यवहार जोरात सुरू आहेत, संध्याकाळी साडेआठ नंतर ते रात्री उशिरापर्यंत गोल्फादेवीच्या पुढे अचानक क्रीडा मंडळ, स्मशानाच्या बाजूला, वरळी कोळीवाडा या ठिकाणी अवैध जुगाराचा अड्डा चालवला जात आहे. यात पणती पातळीसारखे पट रचले जात आहेत.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन नावाचा एक व्यक्ती या अवैध कृत्यांचे खुलेआम सूत्रसंचालन करत आहे. स्थानिकांनी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला याबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या बेकायदेशीर रॅकेटची पूर्ण कल्पना असूनही, दादर पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या जुगाराच्या अड्ड्यावर संशयास्पद व्यक्तींची सतत ये-जा सुरू असते अनेक स्थानिक रहिवाशी या जुगाराच्या नादामध्ये कंगाल होऊन व्यसनी झालेले आढळतात हा जुगाराचा अड्डा खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात चालवला जात आहे. चालवणाऱ्यांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल कोणतीही भीती नसल्याचे जाणवत आहे. सट्टेबाजीचे व्यवहार चालवले जात आहेत.
या ठिकाणी लोकांची ये-जा असते वेगवेगळ्या माध्यमातून, जुगार व सट्टेबाजी केली जाते.
यामुळे केवळ तरुणांचे भविष्यच उद्ध्वस्त होत नाही, तर वरळी कोळीवाड्यात परिसरातील गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळत आहे. त्यातून चोऱ्यामार्यांचे प्रमाण वाढू शकते.
सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की, हे सर्व उघडपणे घडत असूनही, पोलीस प्रशासनाच्या मौनामुळे अनेक प्रकारच्या शंका निर्माण होत आहेत.
पोलिसांना या बेकायदेशीर धंद्याची माहिती आहे का? किंवा कोणत्यातरी दबावामुळे कारवाई टाळली जात आहे का?
असा सवाल स्थानिक रहिवाशी करत आहेत.
आता हे पाहणे बाकी आहे की, ही बातमी उघडकीस आल्यानंतर दादर पोलीस प्रशासन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आवारे या अवैध सट्टेबाजीच्या धंद्यावर कारवाई करण्यासाठी किती वेळ घेतील ?
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (१८८७ चा मुंबई अधिनियम) हा राज्यातील सर्व प्रकारच्या बेकायदेशीर जुगाराला आळा घालणारा प्रमुख कायदा आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक जुगारगृह चालवणे, त्यामध्ये सहभागी असणे, सट्टा लावणे किंवा जुगाराला प्रोत्साहन देणे हे गंभीर गुन्हे मानले जातात .
जुगारगृह चालवणे: सार्वजनिक जुगारगृह चालवणाऱ्या व्यक्तीला पहिल्या गुन्ह्यात ३ महिने कारावास आणि ३०० रुपये दंड; दुसऱ्या गुन्ह्यात ६ महिने कारावास आणि १,००० रुपये दंड; तर तिसऱ्या व पुढील गुन्ह्यांसाठी १ वर्ष कारावास आणि २,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
जुगारात सहभागी असणे: जुगार खेळताना आढळल्यास ६ महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
अटकेचे अधिकार: पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी किंवा संशयित जागेवर वॉरंटशिवाय छापा टाकण्याचे आणि जुगाराची साधने जप्त करण्याचे अधिकार आहेत.