गोरेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात यांचे जाहीर आभार !!
गोरेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात यांचे जाहीर आभार !!
गोरेगावातील जुगाराचा अड्डा उध्वस्त, पोलिसांची मोठी कामगिरी !!
मुंबई गोरेगाव : कैलास अपार्टमेंट, जॉन प्लेयर कपड्याच्या दुकानाच्या बाजूला, युनियन बँकेच्या शेजारी, फिल्मिस्तान स्टुडिओच्या समोर, एस वी रोड गोरेगाव पश्चिम येथे मॅनेजर वकील सिंग, अजय शर्मा त्यांचे मालक प्राप्त माहितीनुसार (गणेश शेट्टी) यांचा जुगाराचा लॉटरीचा अड्डा होता
गेली अनेक महिने मोठ्या प्रमाणात चालू असलेला जुगाराचा लॉटरीचा अड्डा चालू असल्याची माहिती बातमीकारच्या माध्यमातून उघडकीस आली व बातमीकार तर्फे गोरेगाव पोलीस स्टेशनला आवाहन करण्यात आले होते त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात यांनी बातमीची दखल घेऊन सदरचा जुगाराचा लॉटरीचा अड्डा त्वरित बंद करून टाकला व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केल्याची माहिती बातमीकारला मिळालेली आहे.
गोरगरीब लोक पैशांच्या आवश्यकतेसाठी जुगाराच्या दिशेने वळताना दिसतात, जुगार खेळणाऱ्या लोकांच्या परिवाराचे जीवन उध्वस्त होत आहे. त्या लोकांची घराची आर्थिक परिस्थिती खराब असून त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागतो.
त्या ठिकाणी शेकडो जुगारी आपल्या मेहनतीचे पगाराचे पैसे लावण्यासाठी कधीकधी कर्ज काढून जुगार लावण्यासाठी या ठिकाणी येत होते.
सदरच्या कारवाईबाबत स्थानिक नागरिकांनी, कैलास अपार्टमेंट येथील रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात व गोरेगाव पोलीस ठाण्याचे जाहीर आभार मानलेले आहेत.
अभिषेक बाबाजी शिंदे.
(संपादक- बातमीकार)
डिजिटल वृत्तपत्र
www.batmikar.com
Mobile - 9987676699