रिक्षामध्ये गहाळ झालेल्या १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा पोलिसांनी घेतला शोध !!
रिक्षामध्ये गहाळ झालेल्या १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा पोलिसांनी घेतला शोध !!
नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे
दिनांक ०२/०६/२०२६ रोजी रात्रौ ०८.३० वा. चे सुमारास तक्रारदार महिला वंदना मनोज म्हात्रे या खारेगाव, कळवा ते तुळजाभवानी मंदिर, नौपाडा जि. ठाणे येथे रिक्षाने प्रवास करीत असताना रिक्षामध्ये बॅग विसरून गेल्या. त्यामध्ये त्यांचे १५ तोळे सोन्याचे दागिने व इतर साहीत्य असा मुददेमाल होता.
त्यावरून वंदना यांनी नौपाडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून प्रॉपर्टी मिसींग नं. ८०२/२०२६ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली.
वंदना यांनी दिलेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून, मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे नौपाडा पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार विलास देसाई, पोलीस शिपाई सारंग कांगणे व अनिकेत उभे यांनी तक्रारदार ज्या रिक्षामध्ये बसलेले ठिकाण खारेगाव नाका, कळवा या घटनास्थळावरील तसेच रिक्षा ज्या मार्गाने गेलेल्या ठिकाणचे ठाणे आयुक्तालयातील शासकीय कॅमेरे तसेच खाजगी कॅमेरे असे एकुण ७० ते ८० कॅमेरामधील सी सी टी व्ही फुटेज पडताळून रिक्षा क्रं. एम एच ०४ जे क्यु ७८२६ असा रिक्षा नंबर निष्पन्न करून रिक्षा मालक नामे राजु साव यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातून १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करून तक्रारदार वंदना मनोज म्हात्रे यांना परत करण्यात आले आहे.
सदर कामगिरी हि मा. पोलीस उप आयुक्त श्री. बाळासाहेब पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संभाजीराव जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय दवणे, पोलीस निरीक्षक श्री राठोड (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार देसाई, पोलीस शिपाई कांगणे, उभे यांनी केलेली आहे.
या कामगिरी बाबत ठाणे शहरातील जनते मार्फत नौपाडा पोलीस स्टेशनचे कौतुक केले जात आहे.