
पत्नीच्या प्रियकराच्या खून करून आरोपी फरार....
गुन्हा शाखेने केले २४ तासात जेरबंद ..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनांक १० जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.०० वा सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवन नगर साई बाबा मंदिरा जवळ ऑफ विरा देसाई मार्ग, अंधेरी (प) येथे खून झाल्याची माहिती पोलीस ठाण्यास कळली. आरोपी हा रात्रपाळी ड्युटी करून अचानक लवकर घरी आल्यावर त्याने त्याच्या पत्नीला अन्य ईसमा सोबत पाहिल्याने व संशय आल्याने रागाच्या भरात आरोपीने मयत इसमाच्या शरीरावर चाकूने सपासप वार करून हत्या केली व पळून गेला. म्हणून आंबोली पोलीस ठाणे येथे गु र.कर ५५६/२१ कलम ३०२, ५०६ (२) , ३२३, भा द वि अन्वये गुन्हा नोंदविला.
गुप्त बातमीदार सूत्राकडून, नमूद गुन्ह्यातील आरोपी हा मक्कावाडी, ॲन्टाॅपहील परीसरात लपून बसला असून तो बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत आहे असे समजले.
सदरच्या माहितीवरून लागलीच गु.प्र.शा. गुअ.वि. कक्ष ४ च्या पोलीस पथकाने सापळा रचून सदर पथक नमूद गुन्ह्यातील पाहिजे (wanted) आरोपी हा मक्कावाडी ॲन्टाॅपहील वडाळा मु -३७ परिसरात मिळून आल्याने पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. आरोपीस कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीची कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुढील तपाासासाठी आंबोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची यशस्वी कामगिरी ही सह पोलीस आयुक्त (गुन्हे) - मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त - विरेश प्रभू, पोलीस उप आयुक्त - प्रकाश जाधव, सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक -इंद्रजित मोरे, सपोनि बिराजदार, पो.ह. ३४२७९ कांबळे, पो.ह. ९६०६३३ बल्लाळ, पो.ह. ३०५९३ उत्तम बोटे, पो.ह. २८७९० सावंत, साळुंखे, पो.शि. ०७१५२१ जगताप, पो.शि.०९२११४ रोटे यांनी अथक प्रयत्न करून पार पाडली.
(सौजन्य: प्रतिनिधी - बाळ पंडित)