
वत्सलाबाई अपंग सेवा संस्था !!
जे का रंजले गाजंले. त्यास तुका म्हणे आपले !!
ह्या उक्ती प्रमाणे अखंड समाज सेवेचे व्रत घेतलेल्या अपंगत्व आलेल्या व समाजातील सर्व अडलेल्या नडलेल्या लोकांना सतत मदत करणारे कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता स्वतः होईल तेवढी मदत गरजू विद्यार्थ्यांना, अपंगत्व आलेल्या बंन्धु भगिनीं यांना व जो येईल त्याला योग्य असा मोफत वैद्यकीय सल्ला. सामाजिक, बांधिलकी जपत उपकृत करणारे.
आमचें परममित्र.. श्री.अरुण (दादा) पुंडलिक गव्हाणे सर (वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष)
हे गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे अपंग गरिब आणि गरजू लोकांना सेवा देण्याचे कार्य राष्ट्रीय स्तरावर करित आहे..
आता पर्यंत जे अपंग गरजू व विद्यार्थी त्यांच्याकडे गेले ते कधीच खाली हात माघारी फिरले नाही..
सर्व समाजातील लोकांना त्यांच्या वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या वतीने मदत करण्यात आली आहे..
त्यात त्यांनी अपंग लोकांसाठी स्वयं रोजगार मार्गदर्शन, मोफत स्टॉल, टेलिफोन बूथ, उद्योग धंद्यासाठी लागणारे सरकारी कर्ज, औदयोगिक मोफत प्रशिक्षण, अपंगत्व आलेल्या बंन्धु भगिनींना सायकल इतर अनेक साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोठा सिंहांचा वाटा आहे...
दि.३/१२/२०२१ ह्या अपंग दिनानिमित्त सुध्दा अशेच अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहे..
विशेष म्हणजे अजून ही इतर दानदात्याचे लक्ष त्याच्याकडे गेले नाही... पण ते ही कधीचं कोणाकडे व कोणत्याही राजकीय पक्ष, पुढारी, यांच्याकडे मदतीचा हात मागण्यांसाठी गेले नाहीत..
ते नेहमी म्हणतात माझ्याच्याने जेवढी समाजातील लोकांना मदत होईल तेवढी मदत मी करेन..
ज्यांना माझं कार्य माहीत होईल ते स्वखुशीने पुढे येवून सर्वाधिक मदतीचा हात पुढे करतील..
अशी समाजात अनेक लोक राहतात..व... आहेत. ज्यांना खरोखरच सॅलूट करायला पाहिजे..
आज ह्या आमच्या बातमीकार समुहाच्या वतीने ज्या बंन्धु भगिनींनी अंपगापणावर मात करून जिद्दीला पेटून उठुन अखंडपणे कार्यरत राहून मात केली अशा सर्व बंन्धु भगिनीं मानाचा मुजरा...
आणि ह्या कार्यासाठी दिवस रात्र डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवून मदतीला धावून येणारे आमचें परममित्र.. (वत्सलाबाई अपंग सेवा संस्था.) चे संचालक श्री.अरूण दादा.पुडंलिक गव्हाणे सर.. यांना ही मानाचा मुजरा...
बातमीदार समुहाच्या वतीने आपणांस पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
बातमीकार..संपादक..
श्री.अभिषेक शिंदे !