हळदीकुंकू समारंभ स्वतंत्र स्त्रीत्वाचा आनंद सोहळा ठरावा !!

हळदीकुंकू समारंभ स्वतंत्र स्त्रीत्वाचा आनंद सोहळा ठरावा !!

        मानवी जीवन आनंदी, समृद्ध करण्याचे काम संस्कृती करते. संस्कृती जितकी उदार आणि उदात्त तितके मानवी जीवन अधिक समृद्ध. हळदीकुंकू समारंभ हा देखील हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे. आपल्या सौभाग्याचा सोहळा साजरा करण्याच्या निमित्ताने पतीला दिर्घायुष्य लाभावे यासाठी विवाहित महिलांनी एकत्र येऊन आनंदात साजरा केलेला समारंभ म्हणजे हळदीकुंकू.

         येथेही महिलांवरील पुरुषी वर्चस्व सुचित होते. परंतु बदललेल्या काळाच्या ओघात या परंपरागत आनंदोत्सवात विधवा आणि परित्यक्ता महिलांनाही सामावून घेतल्यास अशा महिलांच्या अपमानास्पद पीडेचे परिमार्जन होऊन, खऱ्या अर्थाने हा "स्वतंत्र स्त्रीत्वाचा आनंद सोहळा" ठरून, ह्या उत्साहजनक सांस्कृतिक परंपरेस उदार आणि उदात्तत्वाचे अधिक मोठे परिमाण लाभू शकेल. खरे तर अशा विधायक सामाजिक बदलांना उत्तेजन देण्याची खरी जबाबदारी राजकीय पक्ष किंवा संघटनांची आहे. परंतु प्रत्यक्षात अशा उदात्त बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्ष  महिलावर्गातील या सोहळ्याच्या लोकप्रियतेचा गैरलाभ घेऊन "ताई-माई-आक्का" अशा भावनिक नात्यांचा दिखाऊ उदोउदो करीत वाट्टेल त्या थराला जाऊन आपली मतपेढी मजबूत करण्यापलीकडे काही करत नाहीत याचा अतिशय खेद होतो.


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week