
मीरा भाईंदर वसई, विरार पोलीस आयुक्तालयाचे कोविड शिथिलता नियम लागू !!
मीरा भाईंदर वसई, विरार पोलीस आयुक्तालयाचे कोविड शिथिलता नियम लागू !!
गेली दोन वर्ष कोविड मुळे मनुष्याचे जीवन विस्कळीत झाले. कितीतरी लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले. आता जाऊन कुठे जीवन सुरळीत होत चालले आहे. नंतर मागील काही दिवसांमध्ये करोना विषाणूचा ओमीक्रोन व्हेरिऍट समोर आला असताना त्याचा वेगात प्रसार होत असल्याने शासना मार्फत विविध प्रतिबंध नियम लागू करण्यात आले होते. सध्या कोविड १९ चा प्रसार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने निर्बंधात शिथिलता दिली आहे. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार कार्य क्षेत्रा करता श्री विजयकांत सागर पोलीस उपायुक्त यांनी शिथिलता नियम लागू केले आहेत.
विवाह सोहळे, सामजिक, राजकीय, धार्मिक, अंत्यविधी, जिम, सलून, स्पा, पूर्व प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, घरपोच सेवा, आंतरराज्य प्रवास घरपोच सेवा इ. बाबींवर शिथिलता नियम लागू करण्यात आले आहेत.
सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकिय, उत्सव, विवाह, अंत्यसंस्कार मेळावे, मंडळाचे कार्यक्रम यात उपस्थिती क्षमतेच्या ५०% किंवा २०० उपस्थिती राहील
सर्व शैक्षणिक संस्थामध्ये ऑनलाइन वर्ग सुरू होतील. सर्व घरपोच सेवांना परवानगी राहील.
सर्व व्यापारी संकुल, सिनेमा हॉल, उपहारगृहे आणि बार, क्रीडासंकुल, व्यायाम शाळा, स्पा जलतरण तलाव, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनस्थळे, मनोरंजन उद्याने, इ.५०% क्षमतेने कार्यरत राहतील.
लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी आंतर राज्य आणि राज्यांतर्गत हालचालीवर कोणतेही निर्बंद्ब नसतील.
पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आंतरराज्य हालचाली ७२ तासांसाठी वैध RT-PCR चाचणी प्रमाण पत्राच्या अधीन असतील. अशा प्रवासासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आवशक्यते व्यतिरिक्त कोणत्याही ना हरकत प्रमाण पत्राची गरज असणार नाही.
शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
सर्व औद्योगिक आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
इथे नमुद नसलेल्या उपक्रमासाठी ५०% क्षमतेची मर्यादा राहील. सदर नियम मीरा भाईंदर वसई विरार महानगर पालिका क्षेत्रा करीता लागू राहतील पुढील आदेश येई पर्यंत.