
उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था तर्फे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सम्पन्न !!
उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था तर्फे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सम्पन्न !!
गेल्या दोन वर्षात करोनाच्या महामारीमध्ये बऱ्याच कुटुंबांनी आपली माणसं हरवली, काहींना ट्रीटमेंट मिळूनही नाही वाचवू शकले, तर काहीजण ट्रीटमेंट वेळेवर मिळाली नाही म्हणून गमावले गेले. असच कधीतरी दुसऱ्या आजारातही होत असत. कधी कधी ट्रॅव्हलिंग वेळेवर नाही मिळालं रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नाहीं झाली तरी बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागतात. आतील गावामध्ये ट्रॅव्हलिंगच्या विशेष करून रात्री खूप समस्या निर्माण होतात.
ह्या अनुषंगाने वसई येथील उमेळमान गावातील आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था यांच्या तर्फे व श्री सचिन हरेश्वर घरत यांच्या सौजन्याने रुग्णवाहिकेच लोकार्पण दिनांक १६ डिसेंबर ०२२ रोजी उमेळमान गावासाठी करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटक वसई विधानसभेचे मा. आमदार लोकनेते श्री . हितेंद्र ठाकूर यांच्या आदेशानुसार वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर श्री नारायण मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी माजी महापौर श्री. नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, माजी नगरसेवक उमा पाटील, माजी नगरसेविका प्रमीला पाटील, माजी नगरसेवक संदेश जाधव, माजी नगरसेवक सचिन घरत तसेच जगदीश घरत, दिनेश पाटील, भरत भोईर तसेच संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, चिटणीस भरत पाटील, खजिनदार विश्वनाथ पाटील मकरंद म्हात्रे आदी उपस्थित होते.