
पाणी शहराच्या वेशीवर !!
पाणी शहराच्या वेशीवर या प्रकल्पाचे अतिरिक् १८५ एम. एल. डी. पाणी नुकतेच वसई विरार शहराच्या वेशीवर दाखल झाले आहे. मात्र संपूर्ण शहरात या पाण्याचे वितरण करण्यास सुरुवात झालेली नसून केवळ चाचणी सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. विविध स्तरांवर या पाण्याची चाचणी सुरू असून त्यानंतर त्याचे वितरण करण्यात येणार आहे. वसई विरार शहराला एमएमआरडीए तर्फे १८५ एमएलडी पाणी देण्यात येत आहे यापैकी पहिल्या टप्प्यात ९० एमएलडी पाणी उचलल्यास महापालिकेने काही दिवसांपासून सुरुवात केली आहे सध्या जलवाहिन्यांचे काम आणि त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित पाणी वसई विरार मध्ये दाखल होणार आहे.
अतिरिक्त पाणी शहराच्या वेशीवर दाखल झाले असले तरी त्याचे वितरण करण्यास महापालिकेने सुरुवात केलेली नाही याबाबत सध्या विविध पद्धतीने तपासणी सुरू आहे. अतिरिक्त पाणी पालिकेच्या जुन्या जलवाहिन्यांमधून नेण्यास योग्य आहे का? पाण्याचे जलवाहिनी फुटेल का यासह पाण्याची शुद्धता आणि इतर चाचण्या करण्यास पालिकेने दहा नोव्हेंबर पासून सुरुवात केली आहे. या तपासणीनंतर संपूर्ण शहरात पाणी वितरित करण्यात येणार आहे असे पालिकेने सांगितले जलकुंभ आणि वाहिन्यांची सद्यस्थिती पलीकडे सध्या ९८ जलकुंभ आहेत नुकते१७ जलकुंभ नव्याने उभारण्यात आले आहेत काशीद कोपर पासून संपूर्ण शहरात सूर्या प्रकल्पाच्या जुन्या योजनेच्या जलवाहिन्या आहेत शहरात नव्याने मोठ्या साडेतीन किलोमीटरच्या जलवाहिन्यात टाकण्यात आले आहेत साडेसहा किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्यांचे बाराशे मीटरचे काम शिल्लक आहे १८५ एम एल डी पाण्यापैकी सुरुवातीला १४ एमएलडी पाणी जलवाहिन्यांमध्ये घेण्यात आले होते.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३० एमएलडी ६२ आणि मग ९२ एमएलडी पाणी घेऊन चाचणी करण्यात आली घेऊन विसरण्यासाठी जलवाहिन्यांची तपासणी सुरू यादरम्यान काही झोनमध्ये पाण्याची तपासणी सुरू यादरम्यान काही ठिकाणी गळती लागल्याचे दिसले जलवाहिन्यांमधून पाणी नव्याने जल कुंभार घेण्यात आले याद्वारे जलकुंभ, जल कुंभाची क्षमता संभाव्य गळती तपासण्यात आली. पाण्याची शुद्धता दाब यांची तपासणी जलवाहिनी वॉशिंग एमएमआर डीए आणि पालिकेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात येत आहे.