
लायन्स क्लब तर्फे वसईत पाणपोईची व्यवस्था.....
लायन्स क्लब व अग्रवाल सेवा संस्था द्वारे शीतल जल पाणपोई योजनेची सोय.
येणारा उन्हाळा तसेच विद्यार्थी, खेळाडू, भाविक तसेच बागेत फिरण्यासाठी येणाऱ्या अबालवृद्धांची तहान थंड व स्वच्छ पाण्याने भागविण्यासाठी लायन्स क्लब व अग्रवाल सेवा संस्था यांच्या द्वारे वसई तालुक्यात पाच ठिकाणी शीतल जल पाणपोई योजनेची सोय करण्याचे निश्चित झाले असून काल तीन योजनांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.
लायन राजेश बालकिशन अग्रवाल हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात, त्यास अनुसरून त्यांचे पूजनीय आई वडीलाच्या स्मरणार्थ, येणारा उन्हाळा तसेच विद्यार्थी, खेळाडू, भाविक तसेच बागेत फिरण्यासाठी येणाऱ्या आबालवृद्धांची तहान थंड व स्वच्छ पाण्याने भागविण्यासाठी मोक्याच्या पाच ठिकाणी वॉटर फिल्टर सहित कुलरची सोय करून देण्यात आली आहे.
त्यांच्या अग्रवाल सेवा संस्था व लायन्स क्लब वसई भरारी आणि लिओ क्लब ऑफ वसई फिनिक्स यांच्या सहयोगाने आज त्यांनी तीन ठिकाणी वॉटर फिल्टर सहित कुलर लावले, तसेच त्याबरोबर साठवण पाण्याच्या टाकीची सुद्धा सोय केली.
तुळजा भवानी मंदिर, गास रोड, सनसिटी इथे एक तर जनकल्याण फॉउंडेशन निर्मळ येथे 2 युनिट लावून त्याचे उद्घाटन करण्यात आले. आणखी 2 ठिकाणी लवकरच युनिट लावण्यात येणार आहेत.
ह्या कार्यक्रमा करिता प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून लायन्स मल्टिपल डिस्ट्रिक्ट पर्यावरण कमिटी चेअरमन लायन डॉ प्रशांत पाटील तसेच विशेष अतिथी म्हणून लायन भारती पवार, लायन श्रद्धा मोरे, लायन हनुमंत भोसले, लायन भावेश धनेचा उपस्थित होते.
लायन रंजना म्हात्रे, लायन दीपक बडगुजर, सीए लायन उमेश मेस्त्री,
लायन निनाद म्हात्रे, लायन दयानंद मानकर, लायन अनिता तेलंगडे, लायन नीलम सिंग, लायन वनिता निनावकर, लायन सुरेश काळे, लायन शंकर शेट्टी, लिओ गिरीश अग्रवाल असा लायन परीवारही उपस्थित होता.
अग्रवाल सेवा संस्था'च्या वतीने त्यांचे ट्रस्टी श्री चंद्रेश झा, श्री महेश अग्रवाल, लायन राजेश अग्रवाल व त्यांची पत्नी, श्री अजय अग्रवाल, श्री लक्ष्मीनारायण अग्रवाल, श्री प्रवीण अग्रवाल, श्री जय अग्रवाल, श्री प्रेमचंद अग्रवाल, श्री नरेश अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.