
भिमराव ढाण्या वाघ या भिम गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न !!
भिमराव ढाण्या वाघ या भिम गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न !!
पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या भारतदेशाच्या विद्येचे वैभव.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या महामंत्राचे जनक. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन कवी सीताराम नरके यांनी केलेली गीत रचना आणि या रचनेला मुंबईचे गायक राजन गिरकर यांनी मराठी चित्रपट गीताच्या चालीत अतिशय बेमालूनपणे गायले आहे. हे गीत भारतीयांच्या पंसतीस उतरेल याची मला शंभर टक्के खात्री आहे. असे उदगार सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मा आबासाहेब रासकर यांनी काढले . रिजेन्ट हॉटेल पुणे येथे भिमराव ढाण्या वाघ.... या गीताच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते .
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानत आणि महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले गुरु मानत होते ही समविचारांची साखळीच बहुजण समाजाला आपली वाटते. हेच आपलेपण मी गीतात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे असे विचार कवी गीतकार सीताराम नरके यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चारदत्त नरके यांनी केले तर आभार मंच्छिद्र नरके यानी मानले या प्रसंगी कवी चंद्रकांत जोगदंड सिने अभिनेते कवी जनाबापू पुणेकर बालकवी युगंधर नरके कवी छगन वाघचोरे निवेदक रानकवी जगदीप वनशिव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पुणे येथील रिजेंट हॉटेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी गीतकार सीतराम नरके यांच्या ११ व्या गीताचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
(जगदीप वनशिव. पुणे)