कोरोना !

 घरा मध्ये राहा  तुम्ही 

 सुरक्षित राहा !!धृ !!

मोठा आला आहे आजार 

तुम्ही नका मानू  रे हार 

घराबाहेर उगाचच तुम्ही  पडू  नका !! 1 !! 

घरा मध्ये राहा  तुम्ही 

 सुरक्षित राहा !!धृ !!

करू नका दैना फुकट जीवाची 

ठेवा अंतर नका करू गर्दी 

असुद्या ध्यानात नका ओलांडू

 लक्ष्मण रेषा !!2!!

घरा मध्ये राहा  तुम्ही 

 सुरक्षित राहा !!धृ !!

जगामध्ये बघा कोरोना कसा थैमान घालितो. 

अमेरिका इटलीच्या छाताडावर बसून नाचतो

धडा घ्या गड्यानो आता वेळीच सावरा.!!3!!

 घरा मध्ये राहा  तुम्ही 

 सुरक्षित राहा !!धृ !!

करा पालन तुम्ही दिलेल्या नियमावलीचे 

सोडून द्या रे वागणे हे बेजबाबदारीचे 

सांगू शकत नाही आपण कधी पडेल 

कोरोनाचा विळखा !!4!!

घरा मध्ये राहा  तुम्ही 

 सुरक्षित राहा !!धृ !!

चला एकच प्रण करू आता सारे आपण 

वेळ आली आता भारत मातेचे ऋण

 फेडू आपण.

घरात थांबून घरात राहून कोरोनाशी देऊ 

मोठा  लढा !!5!!

घरा मध्ये राहा  तुम्ही 

 सुरक्षित राहा !!धृ !!

           (कवी - संदीप गायकवाड)


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week