पालघर जिल्ह्यातील ४ ते ८ वी ची शाळा लवकरच सुरू !!

पालघर जिल्ह्यातील ४ ते ८ वी ची शाळा लवकरच सुरू !!

        दिनांक २०/०१/२०२१ पालघर जिल्यातील प्रायव्हेट सह इतर सरकारी शाळा पुढील हप्त्यात चालू होणार अस शाळेतून आलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या दहा महिन्यापासून करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. व ऑनलाईन शिक्षण चालू करणयात आले होते. आता लवकरच सर्व शाळा नियमीत सुरू करण्याचा निर्धार मराठी व प्रायव्हेट इंग्रजी शाळांमध्ये झाला आहे. पालकांच्या संमती पत्राने मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल.

        गेले ६ महीने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ज्या मुलांना शक्य आहे ती मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु खाजगी शाळेने विशेषतः इंग्रजी शाळांनी संपूर्ण वर्षभराच्या फी ची मागणी पालकांजवळ केलीआहे. शाळेत विचारले असता राज्य सरकारने कोणताही प्रकारचा फी माफीचा परवाना खाजगी शाळांना न दिल्याचे सांगण्यात आले. मुलांच्या फी वर शिक्षकांचे पगार काढले जातात. त्यामुळे पालकांना थोड्याशा सवलतीने संपूर्ण वर्षाची फी भरावी लागेल असे सांगण्यात आले.

       त्यामुळे पालक थोडे नाराज झाले आहेत व महाराष्ट्र सरकार कडून काही फी माफी होईल का अशी अपेक्षा करीत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week