
वसई तालुक्यात काही महिला संघटनांनी राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साह व आनंदाने साजरा केला !
वसई तालुक्यात काही महिला संघटनांनी राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साह व आनंदाने साजरा केला !
दि. २५ दिनांक २४ रोजी संपूर्ण देशभारत राष्ट्रीय बालिका दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. ह्या दिवशी पालघर जिल्ह्यातही काही सामाजिक संघटनांनी प्रामुख्याने वसई तालुक्यातील काही महिला संघटनांनी राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साह व आनंदाने साजरा केला.
महिलांना समान अधिकार मिळवून देण्यास राष्ट्र सक्षम आहे. त्यासाठी भारत देशाने महिला व बालिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. म्हणून मुलींनाही घरात मुलांसारखीच समान वागणुक द्यावी. मुला मुलीत भेदभाव करू नये. असे कार्यक्रमा अंतर्गत सांगण्यात आले. कार्यक्रमात मासाहेब जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्य श्लोक अहिल्या बाई होळकर, कल्पना चावला यांना अभिवादन करण्यात आले. मुलींची भ्रुण हत्या न करता बेटी बचाव बेटी पढाव! अश्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.