वसई तालुक्यातील उमेळमान गावातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम साजरा !

वसई तालुक्यातील उमेळमान गावातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम साजरा !

       वसई तालुक्यातील उमेळमान गावात झेड.पी. च्या प्राथमिक शाळा मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. गावातील कु. हेमाली घरत यांनी (बी.डी.एस.) ची पदवी  नुकतीच घेतली आहे, म्हणून त्यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले. तसेच अंजली पाटील बी.एस.सी झाली असून एम.एस.एस. करीत आहे व जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका आहे. लहानश्या गावातील मुली उच्च शिक्षणाच्या वाटेवर आहेत. म्हणून प्रजासत्ताक दिना निमित्तानं दोघीचा सत्कार उमेळमान गावचे नगरसेवक श्री सचिन घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातील सामाजिक संस्था नेहमीच शाळेला सहकार्य करीत असतात असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जुली अथाईत यांनी सांगितले. तसेच दि. २७ जानेवारी पासून इ. ५ते ७वी चे वर्ग सुरू झाले असे सांगितले तसेच विध्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासून वर्गात प्रवेश दिला जाईल असे सांगितले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका मंजिरी पाटील, ललिता घरत, नीलम पाटील, रिपोर्टर प्रीती तिवारी, भुलेश पाटील, पालघर चे ग्रामसेवक घनश्याम पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

       तसेच जिल्हा परिषद शाळेने थर्मा मीटरची मागणी केली होती, उमेळ मान आगरी मास्टर्स क्रिडा व सामाजिक संस्थेचे सल्लागार श्री भुलेश पाटील यांनी स्वखर्चाने शाळेला थर्मामीटर दिले असे भुलेश पाटील यांनी सांगितले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week