३२ वे रस्ता सुरक्षा अभियान वसई विरार पोलीस वाहतूक शाखा यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान वसई विरार पोलीस वाहतूक शाखा यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...

       ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांचे अनुषंगाने दि.१७/१/२०२१ ते १८/२/२०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. वसई विरार वाहतूक शाखा यांच्या तर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. रिक्षा/टॅक्सी चालक मालक संघटना व सर्व सामान्य नागरिक यांचे करीता वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आले. त्याच बरोबर मोफत चष्मा शिबीर ही घेण्यात आले, मोफत डोळे तपासून कमी दरात चष्मा देण्यात आला. शिबिराला सामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

       तसेच मुंबई बस चालक मालक संघटना यांनी आयोजित केलेल्या शिबिरात हजर राहून बस चालक यांना वाहतूक नियम व रास्ता सुरक्षा या बाबत वरीष्ठ अधिकारी वाहतूक शाखा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वसई विरार विभागातील वाहन चालक आणि नागरिकांना वाहतूक नियम व रास्ता सुरक्षा बाबत प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. असे सहा. पो.उप.निरीक्षक वाहतूक शाखा श्री रवी परब यांनी माहिती देताना सांगितले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week