
वसई स्टेशन माणिकपूर नाक्यावर सिग्नल हवा !!
वसई: दि २५ वसई स्टेशन पासून काही अंतरावर असलेला माणिकपूर नाका चौक आहे. तेथे वसई स्टेशन पासून सरळ वे वसई गावात रस्ता जातो. माणिकपूर नाक्यावर उमेलमान व ऑप.बाजूला दिवानंमान असे दोन क्रॉसिंग रस्ते आहेत. ह्या दोन्ही गावांची मेन रोड वरून क्रॉसिंग करताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडते. पेसेंजर भरलेल्या रिक्षा क्रॉसिंग करताना अपघाताचे भय नेहमीच लागलेलं असते. वाहन चालकांची नेहमीच बाचाबाची भांडण होत असतात.
नाक्यावर सतत वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात. त्यामुळे जो तो प्रथम क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करीत असतो. व वाहनांची गर्दी होते. हे सगळं थांबवण्यासाठी माणिकपूर नाक्यावर क्रॉसिंग सिग्नल हवा. असे सर्व वाहन चालकांचे व पादचारी क्रॉसिंग करणाऱ्यांचे मत आहे व माणिकपूर नाक्यावर लवकरात लवकर सिग्नल लावावा अशी सर्व नागरिक मागणी करीत आहेत.