
नाला सोपाऱ्यात बँनर लावण्या वरून भांडण तीन मनसे कार्यकर्त्याना मारहाण ??
नाला सोपाऱ्यात बँनर लावण्या वरून भांडण तीन मनसे कार्यकर्त्याना मारहाण ??
बॅंनर लावण्याच्या वादा वरून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील जमवाकडून मारहाण होत असल्याच समजलं. या घटनेत आचोळे पोलीस ठाण्यात ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा पूर्व भागात रेल्वे ट्रेक जवळील यशवंत विवा मॉल टाऊनशिपच्या जवळ रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. हातात लाठी काठी घेऊन जमावाने मनसे कार्यकर्त्याना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनसे कार्यकर्ते कल्पेश पवार, किरण कुमठेकर, जाधव हे कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर लाईफ केअर नालासोपरा पूर्व ह्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून किरकोळ जखमी झाले आहेत. सौरभ पांडेय वय (२२) वर्ष, अनिल सिंग वय (४५) वर्ष अशी मनसे कार्यकर्त्याना मारहाण करणाऱ्या आरोपींची नाव आहेत. त्यांना अटक झाली आहे. अधिक तपास आचोळे पोलीस करत आहेत. मात्र परप्रांतीय विरुद्ध मनसे कार्यकर्ता असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.