
यंदा वसई कला क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांचे दोन्ही लसीकरण अनिवार्य !!
यंदा वसई कला क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांचे दोन्ही लसीकरण अनिवार्य !!
वसई -विरार कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाची बैठक नुकतीच गणपतराव कदम क्रीडा भवन मध्ये पार पडली. यावेळी होणारा कला क्रीडा महोत्सव करोना निर्बंधाबाबत शासन नियमांना अधीन राहून आयोजित केला जाईल. त्यासंबंधी शासनाची परवानगी अंतिम टप्यात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी सभेत दिली.
ह्या महोत्सवात सहभागी होणाऱ्या आयोजक, खेळाडू यांना दोन्ही लसीचे डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. महोत्सव आयोजनासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले असून शासन परवानगी मिळाल्या नंतर त्यानुसार प्रत्यक्ष आयोजन करण्यात येईल. बहुतेक स्पर्धा प्रेक्षकविना खेळविण्याची परवानगी मिळण्याची शक्यता असल्याने प्रेक्षकांना स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी केबल, इंटरनेट द्वारे थेट प्रेक्षपणाची व्यवस्था करून देण्यात येईल. स्पर्धेच्या ठिकाणी दोन्ही लसी झाल्याचा दाखला तपासल्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. त्याची सुरवात म्हणून सर्व कार्यकर्त्यांना दोन्ही लसी पूर्ण झाल्याच्या दाखल्याची प्रत पुढच्या सभेपर्यंत आयोजकाकडे जमा करण्यास सांगितले आहे.
दोन वर्षांपासून करोनाच्या महामारीमुळे स्पर्धेपासून दूर राहिलेल्या स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देणे हा मूळ हेतू असणार आहे. त्यामुळे सर्व स्पर्धक कार्यकर्ते व उत्सव प्रिय वसईकर या सर्वांच्या सहकार्याने कला क्रीडा महो्त्सव यशस्वी करण्यास प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी सांगितले. या बैठकीला संतोष वळवईकर, अनिल वाझ, केवल वर्तक, विद्या पाटील, देवेंद्र दांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.