
मुंबई जिल्ह्यासहित पालघर जिल्ह्यात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार हवामान खात्याचा इशारा !!
मुंबई जिल्ह्यासहित पालघर जिल्ह्यात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार हवामान खात्याचा इशारा !!
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र भागात सतत पाऊस सुरू आहे. गेले काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे पिकावर परिणाम होत आहे. येत्या २४ तासात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. दरम्यान ३४अरेबियन सी म्हणजे लक्षद्वीप मालदीव जवळ चक्री वादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या द्रोणीय भागामुळे राज्यात महाराष्ट्र कोकण आणि समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या मुंबई आणि पालघर जिल्ह्यातही याचा प्रभाव जाणवत आहे
रात्री ३ वाजल्या पासून मुंबई व पहाटे ६ वाजल्या पासून पालघर जिल्हयात पावसाची संतत धार सुरू आहे. येत्या २४ तासात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.