लाच स्वीकारताना जीएसटी अधिकारी अटकेत !!

लाच स्वीकारताना जीएसटी अधिकारी अटकेत !!

      थकीत सेवा कर न भरल्या बाबत कारवाई टाळण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ७० हजार रुपयाची मागणी करून, सोमवारी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून सोमवारी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लाच खोर जीएसटी अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.

          बोईसर जिल्हा पालघर येथील तक्रारदार श्री चौधरी यांच्या २०१५ आणि २०१६-१७ या वित्तीय वर्षाचा सेवा कर  भरणा थकीत असल्यामुळे याबाबत चौधरी यांनी वरील कारवाई टाळण्यासाठी जीएसटी अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी तक्रारदार श्री चौधरी यांच्याकडे ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत पडताळणी करून  दि, ६ डिसेंबर रोजी सीबीआय ने सापळा रचून चौधरी यांचे कडून १० हजार रुपये लाच स्वीकारताना जीएसटी अधिकारी सिद्धार्थ कौशल यांना रंगे हात अटक केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week