प्राथमिक आरोग्य केंद्राचे पाण्याविना बेहाल !

प्राथमिक आरोग्य केंद्राचे पाण्याविना बेहाल !

     वसई -विरार महानगर पालिका येथे लक्ष देईल का?

      विरार चंदनसार येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रा मार्फत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. मात्र सद्यस्थितीत या आरोग्य केंद्रात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाणीच नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

        हे आरोग्य केंद्र पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने या ठिकाणी पालिकेकडून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र मागील सहा महीन्यांपासून योग्य रित्या पाणी पुरवठा होत नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगीतले आहे. दररोज विविध प्रकारच्या तपासणी, तसेच सलाईन, तर आता काही नागरिक लसिकरण करवून घेण्यासाठी येत असतात. तर जवळपास १२ अधिकारी व कर्मचारी येथे कार्यरत आहेत. त्यांना वापरासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैर सोय होऊ लागली आहे.

     आरोग्य केंद्राला पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या कडुन अजूनही दुर्लक्ष होत असल्याने अजूनही आरोग्य केंद्राला पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. पालिकेने रुग्णांची आणि येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाण्या वाचून होणारी गैरसोय लक्षात घेता पालिकेने  लवकरात लवकर पाणी पुरवठा करावा अशी मागणी आरोग्य केंद्राने केली आहे.

     पालिकेने पाणी पुरवठा सुरळीत करावा ह्यासाठी पत्र व्यवहार ही आरोग केंद्राने केला आहे, परंतु आरोग्य केंद्राच्या स्वछतेची ही पाण्याच्या अभावामुळे गैर सोय निर्माण  झाली आहे. नागरिक आरोग्य केंद्रात स्वस्थ होण्यासाठी येतात पण पालिकेने आरोग्य विभागात केलेल्या कानाडोळ्यामुळे नागरिकही संतप्त झाले आहेत.

     आता निवडणुका येत आहेत आम्ही आता बघून घेऊ असे नागरिक बोलत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week