पोलीस उपायुक्त पथकाची ऑर्केस्ट्रा बार वर धाड ६ बारबालांची सुटका !!

पोलीस उपायुक्त पथकाची ऑर्केस्ट्रा बार वर धाड ६ बारबालांची सुटका !!

      मिरारोड काशिमीरा पोलीस ठाण्याच्या समोर व छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लगत चालणाऱ्या सारंग ऑर्केस्ट्रा बार वर पोलीस उपयुक्तांच्या पथकाने बुधवारी रात्री धाड टाकून १७ जणांना ताब्यात घेत ६ बारबालांची सुटका केली. पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने बुधवारी रात्री सारंग ऑर्केस्ट्रा बार वर धाड टाकली. त्यावेळी गायकीच्या आड प्रमाणापेक्षा जास्त असलेल्या ६ बारबालांना तोकड्या अर्धनग्न कपड्यात अश्लील हावभाव करीत नाचविले जात असल्याचे आढळून आले. 

         पोलीस पथकाने बारच्या ११ कर्मचाऱ्यांना, तसेच ६ ग्राहकांना पकडले. बारबालाची सुटका करत बारमधून १७ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण, अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून बार चालक जगदीश, अमीन व मालक कृष्णा गोविंद शेट्टी ह्यांचा शोध पोलीस घेत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week