तुळींज पोलिसांनी दिल्या नोटरी करणाऱ्यांना नोटीस !!

तुळींज पोलिसांनी दिल्या नोटरी करणाऱ्यांना नोटीस !!

       वसई विरारमध्ये बनावट नोटरीचा सर्रास वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाटयाने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या हद्दीतील नोटरी करणाऱ्यांना नोटीस बजावून बनावट नोटरी करू नका या सोबतच कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

       नालासोपाऱ्यात सर्वाधिक नोटरी करणारे आहेत हे विशेष बिल्डर आणि नोटरी यांच्या संगनमताने गरीब जनतेची फसवणूक होत आहे. एक सदनिका बनावट नोटरीद्वारे चार जणांना विकली जाते, गेल्या पाच वर्षात तुळींज पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे बऱ्याच जणांची फसवणूक झाली आहे. या सोबत पाचशेहुन अधिक  लोकांची तक्रार पत्रे पोलिसांना देण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वसई  विरार मध्ये बनावट नोटरीची संख्या मोठी आहे. बिल्डर, दलालांच्या माध्यमातून येथे बनावट नोटरीचा धंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांशी फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. 

       शुक्रवारी संध्याकाळी तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कांबळे यांनी नोटरी करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून नोटीसा बजावल्या आहेत. यासोबत चाळीतील घरे, दुकाने, सदनिका विक्री व्यवहाराचे बनावट नवीन नोटरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा कडक सूचनाही त्यांना दिल्या. तुळींज हद्दीत बनावट नोटरीचा धंदा सुरु असल्याचे राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week