
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचा वेश्याव्यवसायावर छापा दोन मुलींची सुटका !!
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचा वेश्याव्यवसायावर छापा दोन मुलींची सुटका !!
आजकाल व्यवसाय हा काही स्रियांची मजबुरी बनला असुन त्या अनुषंगाने त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलून स्रियांची दलाली करून (मुह मांगी रक्कम) मिळविण्यास काही निर्लज्ज पुरुषांनी लॉज मध्ये मुली पुरविण्याचा धंदा खोलून ठेवला आहे.
दिनांक १३/१२/२१ रोजी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाचे पोलीस अंमलदार उमेश पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की मिरारोड पूर्व येथे राहणारा सुधीर नावाचा इसम हा वेश्यागमनाच्या मोबदल्यात गिऱ्हाईकांना मीरा भाईंदर परिसरातील लॉजमध्ये मुली पुरवितो.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एस.एस.पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना जलाजा लॉजच्या आवारात मच्छी मार्केट मीरा भाईंदर रोड मिरारोड पूर्व या ठिकाणी पाठवून सत्यता पडताळून पोलीस पथकासह दिनांक १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी लॉज वर छापा टाकला असता दयाली उर्फ सुधीरचरण साव वय वर्ष ३६ रा. गणेशनगर चाळ, शिवसेना गल्ली, बोरिवली पूर्व मुंबई ह्याचे मुळ ग्राम बारीसाकी, ता. जि. चत्रा, राज्य झारखंड हा वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गिऱ्हाईकांना मुली पुरवीत असताना मिळून आला. सदर प्रकरणा बाबत, पोलीस हवालदार उमेश हरी पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने आरोपी १) दयाली उर्फ सुधीर चरण साव, याच्या विरुद्ध नयानगर पोलीस ठाणे येथे कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संपतराव पाटील, पो हवालदार उमेश पाटील, विजय निलंगे, पोलीस अंमलदार केशव शिंदे, महिला पोलीस नाईक वैष्णवी यंबर, महिला पोलीस शिपाई सुप्रिया तिवले, चा.पोलीस नाईक गावडे सर्व नेम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी पार पाडली आहे.