
पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन, बेकायदेशीर व्यवसाय व गुन्हे गारांवर कारवाई !!
पोलिसांचं ऑल आउट ऑपरेशन, बेकायदेशीर व्यवसाय व गुन्हे गारांवर कारवाई !!
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीत ऑपरेशन ऑल आउट राबऊन अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर कारवाई !
हल्ली काही बडया लोकांच्या आशीर्वादाने मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध व्यवसायची बेसुमार वाढ झाली आहे. पोटाची खळगी भरण्याच्या निमित्ताने भाजीपाला विक्री बरोबर भरपूर अवैध व्यवसाय ही सर्रास सुरू आहेत. अश्याच काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे.
दिनांक१३ डिसेंबर २१ रोजी रात्री ११ च्या सुमारास ते १४ डिसेंबर पहाटे ३ वाजेपर्यंत मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील सर्व पोलीस ठाण्याकडुन एकूण १६९ पोलीस अधिकारी व ५४४ पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या ऑपरेशन ऑल आऊट राबविले. सदर कारवाई दरम्यान अवैध दारू विक्री करणारे, जुगार खेळणारे, अवैधरित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणारे, त्याचप्रमाणे इतर अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच फरार गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तलयातील परिसरात एकूण ३१ ठिकाणी नाकाबंदी लावून ३८३ बेशिस्त वाहनचालकांवर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सदर मोहिमे दरम्यान मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रांमध्ये खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
१. अवैध दारू विक्री, वाहतूक, उत्पादन बाळगणारे ३२ जण,
२. अवैध जुगार २ जण,
३. गुटका तबाखू जन्य पदार्थ ४ जण,
४. अवैध शस्त्र जप्ती (कोयते, तलवारी, सुरा इ.) २ जण,
५. पाहिजे असलेले आरोपी संख्या १३ जण अटकेत,
६. अभिलेखावर तपासले आरोपी एकूण २२९ जण,
७. वाहन तपासणीत कारवाई केलेले १४८२ आरोपी,
८. अंमली पदार्थ विरोधी कारवाई (एनडीपीएस) एकूण ४ गुन्हेगार,
९. अंमली पदार्थ सेवन करणारे (एनडीपीएस) एकूण ३८ आरोपी,
१०. म.पो.का.कलम१४२ अन्वये कारवाई करण्यात आलेले २ जण,
११. रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरणे कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आलेले आरोपी ५ जण,
१२. मोटरवाहन कायद्यान्वेये करण्यात आलेली कारवाई एकूण ३८३ जण.
अवैध व्यवसाय करणाऱ्या आरोपीं विरुद्ध कारवाई करून व आरोपींना अटक करून मीरा भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय (गुन्हे शाखा) यांनी उत्तम रित्या कामगिरी पार केल्यामुळे आयुक्तालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.