
वसई नाताळ सणाच्या स्वागतासाठी सज्ज !!
वसई हे जगप्रसिद्ध ऐतिहासिक शहर आहे. पोर्तुगीज काळा पासून वसईत ख्रिश्चन धर्मियांचे वास्तव आहे. वसईत ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. गोव्या प्रमाणेच वसईत ही नाताळचा सण जोरदार जल्लोषात साजरा करतात. दोन वर्षांपासून करोनाच्या जागतिक महामारी मुळे इतर सणांबरोबर नाताळ सणावरही विरजन पडलं होतं. परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, तसेच शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे, दोन वर्षाने नाताळ सण साजरा करता येणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. नाताळ चा महत्वाचा असतो तो 24 तारखेचा रात्री 12 चा मिस्सा, येशू जन्माचा. शासनाने परमिशन दिल्याने काही लोक देवळात चर्च मध्ये जाण्याच्या तयारीत लागले आहेत.. दारात ख्रिसमस ट्री रोषणाईने सजले आहेत दारात गोठे बनविले आहेत. वसई पश्चिम पट्ट्यात प्रत्येक घरात येशूच्या जन्माची लगबग पहावयास मिळत आहे. करोना काळात सर्वच साहित्याचा भाव 25 ते 30 % वाढला आहे तरीही त्याचा परिणाम काही इतका प्रभावी झाला नाही.
वसई ही सर्व धर्मियांची नगरी आहे. त्यामुळे इथे सर्व सण मिळून करतात. एकमेकांच्या घरी आवर्जून न बोलवता भेटायला जातात. लग्न कार्य पूजा ईद नाताळ सर्व एकत्र साजरे करतात हे वसई आपलं वेगळं पण राखून आहे.