
वसईतील पेशवेकालीन जरीमरी मंदिराचा वर्धापनदिन दिमाखात साजरा !!
वसईतील पेशवेकालीन जरीमरी मंदिराचा वर्धापनदिन दिमाखात साजरा !!
सुप्रसिद्ध ऐतिहासिक शहर वसई इथे पेशवकाळीं पडीक जरीमरीचे मंदिर होते. पेशवे काही काळ वसईत वास्तव करून राहिले होते ज्या वेळेस पेशव्यांनी किल्ला सर केला त्यावेळेस मराठ्यांची आठवण अथवा त्यांच अस्तित्व लक्षात राहावं यासाठी त्यानी वसई किल्यात व वसई किल्ल्याच्या बाहेर हिंदूंची देवळे बांधली.
त्या देवळाबरोबरच जरीमरीचे मातेचे मंदिरही उभारले होते ते आता पडीक अवस्थेत झाले होते. उमेलमान गाव, तालुका वसई, जि. पालघर, वसई वेस्ट येथे राहणारे श्री दिनेश पाटील यांनी स्वखर्चाने १६ वर्षांपूर्वी स्वखर्चाने जीर्णोद्धार केला होता. प्रत्येक वर्धापनदिनी स्वखर्चाने देवीची पूजा व भंडारा मोठ्या प्रमाणात करतात. भंडाऱ्याच्या प्रसादाचा दरवर्षी हजार लोक लाभ घेतात.
१९ डिसेंबर रोजी मंदिराचा १७ वा वर्धपान दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला सकाळी, पूजा होम करण्यात आली. नंतर भविकांसाठी भंडाऱ्याच आयोजन करण्यात आलं होतं. जवळ जवळ एक हजार लोकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला.
वर्धापन दिन यशस्वी करण्यास दिनेश पाटील, वंदना पाटील, रसिका, प्रियांका, जयेश पाटील, सुरेंद्र पाटील, प्रज्ञा पाटील, प्रवीण पाटील, भास्कर पाटील, सुनंदा पाटील, अभय कासार , सुनीता कासार, आकाश, आकांक्षा, सीमा पाटील, तन्वी, चंद्रकांत घरत, शिला घरत, मंजुळा पाटील, सुनील झारखंड, जितू पासवान, जावेद खान मंडप सजावट भोलानाथ डेकोरेटर, जेवण सन्देश पाटील, नागेश पाटील, विनायक पाटील, विशेष सहायक सावे सर, अभिषेक, रामचंद्र चव्हाण, नेरकर, रमेश पाटील, गंगाराम कदम, शिवराम सुळे, गावकर, जितू पलांडे, गणेश हातोडे, दिनेश राठोड यांनी पार पाडली.