मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयाचे नागरिकांना आवाहन, बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या सावकारां पासून सावधान !!

मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयाचे नागरिकांना आवाहन, बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या सावकारां पासून सावधान !!

         मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अनेक व्यक्ती बेकायदेशीर रित्या सावकारी करून मजूर, कामगार, सामान्य नागरिक यांना वेठीस धरून दिलेल्या मूळ रकमेपेक्षा, जास्तीत जास्त प्रमाणात व्याज वसूल करीत असल्याचे व सामान्य लोकांची छळवणूक करीत असल्याचे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयाच्या निदर्शनास आले.

     सामान्य लोक सावकाराच्या प्रभावाखाली दबलेले असतात, त्यामुळे घाबरून ते पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत नाहीत, त्यामुळे अश्या सावकारांचे चांगलेच फावते, अश्या बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार येथील नागरिकांना बातमीकार या ऑनलाइन वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत असणाऱ्या व्यक्तिविरुद्ध माहिती किंवा तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन ला देण्यात यावी असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी