वरसावे पुलाजवळील चौकामध्ये व्हॅक्युलर अंडरपास तयार करायचा असल्याने, मुंबई कडून अहमदाबाद कडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल .

वरसावे पुलाजवळील चौकामध्ये व्हॅक्युलर अंडरपास तयार करायचा असल्याने, मुंबई कडून अहमदाबाद कडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल .

      मुंबई अहमदाबाद हायवे वरील वरसावे जंक्शन येथे नेशनल हायवे ऑथोरीटी ऑफ इंडीया (एन.एच.ए.आय.) तर्फे नवीन उड्डाणपूलाचे काम चालू आहे. वरसावे चौकामध्ये व्हेक्युलर अंडरपास (व्हीयुपी) चे बांधकाम करण्यासाठी वरसावे चौकामध्ये मुंबईकडून गुजरात कडे जाणारी एक वहिनी पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. व्हेक्युलर अंडर पासचे पुढील काम सुरू करायचे असल्याने काम करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी समजावून घेण्यासाठी व काय काय समस्या उद्भवू शकतात, याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी एन एच एआय ला उपाय करणे आवश्यक झाले होते. दि. ३/१/२२ पासून ते ५/२२ 'पर्यंत वरसावे नाका येथे, मुंबई कडून गुजरात कडे  जाणारी मूळ वहिनी इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरून वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. 

           तरी सदर चे काम पुढील आदेश होई पर्यंत प्रवाशांना खालील पूर्वीचाच पर्यायी मार्ग देण्यात येत आहे.

           वाहने: मुंबई कडुन गुजरात कडे जाणारी  वाहने

           वरसावे नाक्याजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या अलीकडून, महामार्गाला मिळणाऱ्या जुन्या घोडबंदर मार्गाने जातील.

    सदर मार्गाने वरसावे चौकात मिळून डाव्या बाजूस वळून इच्छित स्थळी जातील.

२) मुंबई कडून ठाणे, नाशिक पुणे कडे जाणारी वाहने: 

  वरसावे नाक्या जवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील डायव्हर्शन रोड ने जातील.

    सदर मार्गाने वरसावे चौकात मिळून उजवी कडे वळून इच्छित स्थळी जातील.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week