मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

      २६ जानेवारी 22 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तल्याच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निदर्शनाचे पालन करून  ध्वजारोहणाचा कार्यक्रम सम्पन्न झाला. ह्या कार्यक्रमा अंतर्गत मा.श्री सदानंद दाते पोलीस आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी आणि अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या. 

         तसेच पोलीस दलात भरती होणाऱ्या प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांनी खात्यातील पहिल्या दिवसा पासुन ते सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवसा पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रामाणिक राहून कर्तव्य करायला हवे अशी अपेक्षा करून मार्गदर्शन केले. तसेच नालासोपाराचे साहाय्यक पोलीस आयुक्त श्री. चंद्रकांत जाधव यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्धल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने मा. पोलीस आयुक्त यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week