हवस के पुजारी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

हवस के पुजारी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

      काही माणसं इतकी घाणेरड्या आणि किळसवाण्या विचारांची असतात. अशा माणसाची वृत्ती आणि त्याची सोच, त्याची मानसिकता, त्यांची कृत्य ही इतकी वाईट असतात. लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणं त्यांचं लैगिंक शोषण करणं आणि असल्या घाणेरड्या प्रवृत्तीचे विचार कौमार्य भंग करण्याची त्याची मानसिकता. अश्या लैगिंक शोषण करणाऱ्या नरधमांची अशी चीड येते की त्यांना फाशी देण्यापेक्षा असल्या नराधमांच लिंग छाटून त्यांना सोडून द्यावं व मरणा पेक्षा शारीरीक यातना देऊन आयुष्यभराचा धडा शिकवावा अस वाटत. आये दिन समूह बलात्कार, जबरदस्ती लैगिंक शोषण करणं अशा कितीतरी घटना रोज घडत असतात. मुलगी वयात आली की तिची जास्त काळजी आई वडिलांना लागून जाते. आपल्या मुलीच कधी लैगिंक शोषण होऊ नये ही भीती प्रत्येक पालकांना सतावत असते ही सत्य परिस्तिथी आहे. मुलीला एकट सोडणंही त्यांच्या जीवावर येत. मुलीच्या सुरक्षिततेची चिंता त्यांना सतावत असते. एखाद्या व्यक्तीच्या भरोशावर मुलींना सोडून जाण म्हणजे चिंतेची बाब असते.

            आणि आपला भारतदेश इतका प्रगत झाला असताना महिलांच्या सुरक्षिततेचा कायदा अजून खुप कडक झाला नाही आणि अजूनही देशात महिला सुरक्षित नाहीत ह्याच दुःखही वाटत. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण हा नरधमांचा जणू शौकच बनला आहे.

      अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणारी किळसवाणी घटना नालासोपारा येथे घडली. दिनांक २७ फेब्रुवारी २२ रोजी एका अल्पवयीन मुलीने पेल्हार पोलीस ठाणे तालुका वसई येथे येऊन तक्रार केली की दिनांक २५ फेब्रुवारी २२ रोजी संध्याकाळी पीडित मुलीच्या पालकांचा कायदेशीर रखवालीत असणारा फैजल वय वर्ष 30 याने पिडीत मुलीला त्याच्या टेम्पोतुन फिरून आणतो असे अमिष दाखवून तिला टेम्पोत बसवून बादशाह गार्डन, भाईंदर पूर्व येथुन नाला सोपारा फाटा नालासोपारा पूर्व ह्या निर्जन स्थळी रात्री 11 च्या सुमारास घेऊन आला व एका पत्र्याच्या शेड मध्ये तिच्याबरोबर जबरी संभोग केला व तिच्या कडील मोबाईल काढुन घेतला व झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जीवे ठार मारीन अशी धमकी तिला दिली.

              पीडित मुलीने हिम्मत करून तिने पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार केली. सदर गुन्ह्याच्या आरोपिताला अटक करण्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली व तांत्रिक माहिती गुप्तबातमीदार याच्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार आरोपीताचा कसोशीने शोध घेऊन मोहम्मद फैजल सरवर, रा. नालासोपारा पूर्व तालुका वसई ह्याला पेल्हार पोलिसांनी अटक केली. पीडित मुलीला त्याच्या बद्दल काही एक माहिती नसताना घटनास्थळी मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मोहम्मद फैजल यास अटक करून भारतीय दंड विधान कलम ३७६, ३६३,५०६ हया बालकांचे लैगिंक शोषण कायदा कलम ४, ८, १२ ह्या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

              सदरची कामगिरी श्री प्रशांत वाघुंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ विरार, श्री. रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, महेंद्र शेलार पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, पोलीस नाईक तानाजी चव्हाण, प्रताप पाचूंदे, पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांनी यशस्वी केली. 

       


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week