
खून ! मित्राला दिलेल्या धमकीतून मित्राने केला खून !!
खून ! मित्राला दिलेल्या धमकीतून मित्राने केला खून !!
खून करण म्हणजे खेळ होऊन बसलंय. क्षुल्लक कारणावरून लोक एक दुसऱ्याचा खून करतात. कुणाशी वादही करायला नको. पण खून करणाऱ्या व्यक्तीच्या मनात भीती कशी नसते ? कुणाच्या पाठिंब्याच्या आधारावर असले गुन्हे माणसं करतात, हे विचार करण्यासारखे आहे.
अशीच एक घटना लालबाग येथे घडली. दिनांक २७ फेब्रुवारी २२ रोजी रात्रीं पावणे बाराच्या सुमारास श्री. आकाश भरगुडे याने लालबाग येथील चव्हाण बंधू मसालेवाले यांच्या मित्रास दमदाटी केली म्हणून चव्हाण बंधू मसाले वाले दुकान नंबर ३, चिवडा गल्ली, लालबाग मुंबई याने श्री. आकाश भरुगडे याच्या छातीवर उजव्या बाजूस चाकूने भोसकून जीवे ठार मारले म्हणून फिर्यादी श्री. सचिन शंकर चव्हाण वय वर्ष ३९ व्यवसाय मसाले विक्री राहणार २/बी, श्री गणेश नगर को.ऑ. सोसायटी, लालबाग मुंबई यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा रजि क्र.३४/२२ कलम ३०२ भारतीय दंड विधान अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला.