
बिस्मिल्ला रहमाने रहीम !! काली जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलांना 'गुमराह' करून करतात संभोग !
बिस्मिल्ला रहमाने रहीम !! काली जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलांना 'गुमराह' करून करतात संभोग !
जादू टोना करून महिलेवर लैगिक अत्याचार करणाऱ्या आरोपितांना अटक
देश वैज्ञानिक दृष्टया प्रगत झाला असला तरी, आणि मनुष्य कितीही हाय एज्युकेटेड झाला असला, तरी अजूनही जादू टोना काळीजादू, करणी भूतप्रेत ह्या गोचितून सुटला नाही, अजूनही त्यांची मानसिकता करणी, काली जादू ह्यात अडकलेली आहे आणि ह्या प्रकारात महिला जास्त विश्वासू दिसून येतात. एखादी वाईट घटना घडताच आपल्यावर कुणी काही करणी केली आहे का हा विचार त्यांच्या डोक्यात घोळायला सुरुवात होते आणि मग जादू टोना करणारे बाबा मौलाना अशांकडे त्या आपसूक निघून जातात. पण कधीतरी ह्या सर्व प्रकारात घाबरून महिलाही जबरदस्तीने काही वाईट कृत्य करण्यास तयार होतात आणि ह्या प्रकारात महिलांचे लैगिक शोषण जास्त होते. असाच प्रकार नालासोपारा तालुका वसई येथे घडला.
रशीद कंपाउंड, गवराईपाडा नाका, नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथील एका चाळीतील गाळ्यामध्ये मौलाना रजब्ब शेख वय वर्ष २७ व शहा बुद्दीन हे दोघे, तक्रारदार महिला हिला तुझ्यावर काळी जादू केली आहे. ती उतरवतो असे सांगून तिच्यावर जादूटोना करण्याच्या बहाण्याने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या सोबत दोघे जण जबरी संभोग करीत होते. याबाबाबत फिर्यादी पीडित महिला वय वर्ष २० हिने पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या अनुषंगाने जादूटोना प्रतिबंध अधिनियम कलम प्रमाणे दिनांक २६ फेब्रुवारी २२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणं शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी ताबोडतोब घटनास्थळी भेट घेऊन गुन्ह्याचे आरोपी यांचे बाबत माहिती घेतली असता ते दोघे राहत ठिकाण सोडून पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपिताचा कसोशीने शोध घेऊन रजब्ब अल मोहम्मद इसहाक शेख वय वर्ष २७ रा.नालासोपारा पूर्व, शहबुद्दीन अकबर अली शेख वय वर्ष ५० रा. नालासोपारा पूर्व तालुका वसई हे पळून जाण्याचा तयारीत असताना त्याना पेल्हार गुन्हे प्रकटी करणं शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वी रित्या ताब्यात घेतले त्यांच्या जवळ चौकशी केली असता पिडीत महिलेवर असलेली काळी जादू उतरवून त्रासातून मुक्त करून देतो अशी आमिषे देऊन जादू टोना करण्याच्या बहाण्याने महिलेसोबत जबरी संभोग करून अत्याचार करीत होते. नमूद आरोपितांना दिनांक २७/२/२०२२ रोजी सदर गुन्ह्यात अटक केली आहे.
सदर ची कामगिरी श्री. प्रशांत वाघुंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ विरार,.श्री. रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री.महेंद्र शेलार पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत अवघडे व गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोलीस उप निरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, पोलीस नाईक तानाजी चव्हाण, प्रताप पाचूंदे, शरद जावळे व पोलीस अंमलदार संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, सागर वाकचौरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.