पैश्याच्या वादा वरून केला खून !!

पैश्याच्या वादा वरून केला खून !!

        कुणाशी व्यवहार केले तर वेळीच पूर्ण करावेत आणि सर्व व्यवहारात पैशाच्या व्यवहारात खूप नातीही बिघडतात, वाद भांडण होतात. कधी कधी पैशाच्या वादावरून खून ही होतात.

       अशीच एक घटना गिरगाव मुंबई येथे घडली. दिनांक ४ मार्च २२ रोजी १ वाजताच्या सुमारास श्री अर्जुन यशवंत सिंह सरहार हे राजश्री कार्ड एम एफ जी को, माधव भवन कंपाउंड खाडिलकर रोड गिरगाव, मुंबई या ठिकाणी असताना यातील अटक आरोपिचा श्री अर्जुन यशवंत सिंह याच्या बरोबर पैशाच्या वाद झाला आणि पैशाच्या वादावरून आरोपिने मयत इसम अर्जुन सिंह याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारला त्यामुळे अर्जुन सिंह ह्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली व त्याचा मृत्यू झाला.

         म्हणून फिर्यादी विजय सहदेव भणगे वय ४३ वर्ष  राहणार माधव भवन कंपाउंड, बी न ६१/एच रूम नंबर ३३ खाडिलकर रोड गिरगाव मुंबई यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा रजि क्र. ३२ भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये व्ही. पी. रोड पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week