जुन्या रागातून केला खुनाचा प्रयत्न !!

जुन्या रागातून केला खुनाचा प्रयत्न !!

      मानवी खून म्हणजे हल्ली कोंबड्या, बकरे कापतात ना तसा शुल्लक होऊन बसला आहे. माणूस छोट्या छोट्या गोष्टीवरून एक दुसऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. 

              दिनांक ४ मार्च २२ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी श्री. सिकंदर अली साबीर अली कुरेशी वय वर्ष ३१ राहणार ठिकाण रूम न ६२७, डीलक्स बिल्डिंग न ०९, नेहरू नगर कुर्ला स्टेशन जवळ कुर्ला पूर्व, मुंबई. हे गोरखनाथ मित्र मंडळाच्या जवळ नागोबा चौक, चुनाभट्टी मुंबई या ठिकाणी असताना यातील अटक आरोपी आणि फरार आरोपी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी सिकंदर कुरेशी याला चॉपर, लाकडी बांबू, पट्टी व रॉडने, डोक्यावर डाव्या पायाच्या मांडीवर, कमरेच्या डाव्या बाजूला व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर जखमी केले व त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

           म्हणून फिर्यादी यांनी चुनाभट्टी पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा रजि कलम ३०७,३२४,३४१,५०४,५०६, ३४ भारतीय दंड विधान (३७) १, (अ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week