ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे चिमुरडीचा गेला जीव !!

ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे चिमुरडीचा गेला जीव !!

     लहान मुलं जेवढी मस्ती करतील तेवढी कमीच त्यांच्यावर दुर्लक्ष झालं की संपल आणि थोडं मुलं बाहेर खेळताना लक्ष देत राहावं लागते. नाहीतर काही अघटित घटना घडण्यास वेळ लागत नाही.

        अशीच एक दुःख विदारक घटना कांदिवली पोईसर येथे घडली, दिनांक ३ मार्च २२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी श्री.राम गणेश फुलचंद, वय ४२, वर्ष यांची नात ही जनिया लल्लू पटेल चाळ पोईसर कांदिवली पूर्व मुंबई येथील रस्त्यावर खेळत असताना आरोपी टेम्पो चालक टेम्पो क्रमांक एम.एच.४७ ए.एस.०८५३ हे वाहन निष्कळजी पणाने चालविले असता, टेम्पो चे पाठीमागील चाक हे फिर्यादी राम फुलचंद यांच्या नातीच्या अंगावरून गेले व तिचा चिरडून मृत्यू झाला .

         राम फुलचंद यांनी समता नगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविली असता टेम्पो चालक याला त्वरीत अटक करून गुन्हा रजि. १०३ कलम ३०४ (अ) २७९ भारतीय दंड विधान कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week