वसईत ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी झाली गजाआड !!

वसईत ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी झाली गजाआड !!

      कार, स्कुटर, यांची चोरी होत असताना आता ऑटोरिक्षा ही चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळक्या तयार होत आहेत.

             दिनांक १६  फेब्रुवारी २२ रोजी  फिर्यादी यांची ऑटो रिक्षा स्वस्तिक अपार्टमेंट झेंडा बझार, कुंभारवाडा, वसई येथे बिल्डिंग खाली पार्क केली असता कुणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली. ह्या बाबत तक्रार नोंदवली गेली होती. म्हणून सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शना प्रमाणे वसई पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून दिनांक ११/३/०२२ रोजी टाकीपाडा, नालासोपारा परिसरात सापळा रचून आरोपी  हुसेन आदम शेख, वय ३१ वर्ष यास अटक केली. तसेच सदर आरोपीताकडे अधिक तपास करून, इतर दोन आरोपी अब्दुल करीम शेख ३८ वर्ष व महिला आरोपी वय ३६ वर्ष यांना आचोळे परिसरातून अटक केली आहे. सदर आरोपीताकडे सखोल चौकशी करून त्यांच्या कडून एकूण ३ ऑटोरिक्षा हस्तगत करून वसई व नालासोपारा येथील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

             सदरची कामगिरी श्री. संजय कुमार पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, श्री. प्रदीप गिरीधर सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग यांचे मार्गदर्शना खाली वसई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कल्याणराव कर्पे, श्री ऋषिकेश पवळ पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार, राम सुरवसे, हेड कॉन्स्टेबल सुनील मालावकर, कॉन्स्टेबल दत्तात्रय मुंढे, अमोल पाटील, जाधव भालेराव यांच्या पथकाने केले आहे


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week