५ करोडचे हिरे मुद्देमाल हस्तगत, दक्षिण मुंबई परिमंडळ २ ची यशस्वी कामगिरी !!

५ करोडचे हिरे मुद्देमाल हस्तगत, दक्षिण मुंबई परिमंडळ २ ची यशस्वी कामगिरी !!

        दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई, अंतर्गत परिमंडळ २ मधील डॉ. द भा पोलीस ठाणे येथे फिर्यादीने ५ करोडचे हिरे चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे, पोलीस निरीक्षक सणस, पोलीस निरीक्षक लोखंडे, सहा. पोलीस निरीक्षक राजपूत, सहा. पोलीस निरीक्षक पोळ, पोलीस उप निरीक्षक पटेल गावडे व पथक यांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळवून १२ तासाच्या आत आरोपीना अटक करून संम्पूर्ण ५ करोड रुपयांचे हिरे, मुद्देमाल  हस्तगत करून सदरचा मुद्देमाल फिर्यादी यांना मा. न्यायालयाच्या आदेशानुसार सुपूर्द करण्यात आला आहे.

            उपरोक्त प्रशंसनिय व उल्लेखनीय कामगिरी बद्दल माननीय श्री विश्वास नांगरे पाटील, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांनी, डॉ दा.भ.मार्ग पोलीस ठाणे हॉल मुंबई पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ मुंबई अंतर्गत पोलीस अंमलदार व अधिकारी यांना विशेष पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविले. सदर वेळी मा. शशी कुमार मीना पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, सहायक पोलिस आयुक्त गिरगाव विभाग राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत  सोहळा पार पडला.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week