
प्रांतीय वादातून खुनाचा प्रयत्न !!
भारताच्या संविधानानुसार कितीही भारत एकसंघ देश मानला तरी अजूनही हवातसा जातीयवाद आणि प्रांतीय वाद भारतातून नाहीसा झाला नाही. भारताच्या नागरिकाने कुठल्याही प्रांतात जाऊन राहावे, नोकरी व्यवहार कामधंदे करावे. ही परवानगी भारताच्या संविधानाने दिली असता. देशात प्रांतीय वाद, जातीयवाद नेहमीच शिगेला पोहचलेला असतो. राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थसाठी प्रांतीय वाद शिगेला पोचवतात, परंतु सर्वसामान्य मूर्ख जनतेला हे कळत नाही की आपला फक्त वापर करून राजकीय सत्तेसाठी नेते नाहक जनतेला फूस लावत असतात आणि मूर्ख जनता जातीय वाद आणि प्रांतीय वाद यांच्या आहारी जाते.
देशात कुणी कुठे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना जातीय व प्रांतीय वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ता सांगून अरेरावी काहीजण करीत असतात. असाच प्रांतीय वादातून एक खुनाचा प्रयत्न दादर येथे घडला.
दिनांक 21 मार्च ०२२ रोजी फिर्यादी अंगद सिंग वय वर्ष २५ राहणार रूम नंबर ४८ गणेश नगर नंबर ३, राजाभाऊ देसाई मार्ग, न्यू प्रभादेवी, दादर (प) मंडळ विकास मंडळ जवळील वाणीआळी गणेश नगर, चाळ नो ३ प्रभादेवी मुंबई या ठिकाणी असताना यातील अटक आरोपी हा ऍक्टिव्हा स्कुटरने विरुद्ध दिशेस जात असताना यातील अटक आरोपी याने फिर्यादी याचे स्कुटरला ठोकर दिली. तसेच आरोपी याने फिर्यादी यांना लाथ मारून खाली पाडले व धमकावले की "येथेच थांब तुम्हाला नेपाळ्याना आज जिवंत सोडत नाही" असे म्हणून आरोपी पळत जाऊन चाकू घेऊन पळत आला व त्याने फिर्यादी तसेच त्याचे काका मेराम गणेश सिंग यांना जीवे ठार मारण्याचा इराद्याने प्रथम फिर्यादी वर वार करून त्याला जखमी केले तसेच त्याच्या काकांच्या छातीत, पोटामध्ये जोराने चाकू मारून जखमी करून गंभीर दुखापत केली.
म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा रजि १७५ कलम ३०७ भारतीय दंड विधान गुन्हा दाखल केला आहे.