
अँक्युप्रेशर थेरपी के साथ बदन की थेरेपी वेश्यांकडून ??
अँक्युप्रेशर थेरपी के साथ बदन की थेरेपी वेश्यांकडून ??
अँक्यूप्रेशर थेरपीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या थेरपी सेंटरवर अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष मीरा-भाईंदर पथकाची कारवाई.
मसाज सेंटर, स्पा, पार्लर, अश्या कित्येक ठिकाणी सर्व्हिस च्या आडे वेश्या व्यवसाय चालत असतो. आता ह्या वेश्या व्यवसाय मध्ये थरेपी सेंटर ही अग्रेसर झाली आहेत.
दिनांक २४ मार्च रोजी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांना विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की 'अँक्युप्रेशर थेरपी सेंटर' बिल्डिंग नंबर १, हॅप्पी होम कॉम्प्लेक्स, शांतीपार्क, मिरारोड पूर्व येथे अँक्युप्रेशर सेंटरचा चालक व व्यवस्थापक हा अँक्युप्रेशरच्या नावाखाली पुरुष गिऱ्हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवितो.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना अँक्यूप्रेशर थेरेपी सेंटर, शॉप नंबर ११, बिल्डींग नो एक, हॅप्पी होम कॉम्प्लेक्स, शांतीपार्क मिरारोड येथे पोलीस पथकाने छापा टाकला असता, अँक्यूप्रेशर थेरपीचा व्यवस्थापक निलोफर मुस्ताक तांबोळी व थेरपी सेंटरचा चालक करीम उर्फ राज कानानी यांनी आपसात संगनमत करून अँक्युप्रेशरथेरपी सेंटर मध्ये बोगस गिऱ्हाईकास ०३ मुलींना दाखवून वेश्या गमनासाठी प्रवृत्त करून वेश्यागमनाच्या मोबदल्यात रक्कम ठरवली व बोगस गिऱ्हाईकाला मुली पुरविल्याने वेश्या गमनाच्या मोबदल्यात स्वीकारलेल्या रकमेसह ताब्यात घेवून तीन पीडित मुलींची सुटका केली. सदर बाबीत सहाय्यक पो उप निरीक्षक उमेश हरी पाटील यांच्या फिर्यादी वरून पहिला आरोपी व्यवस्थापक निलोफर मुस्ताक तांबोळी व चालक करीम उर्फ राज कानानी मिरारोड याच्या विरुद्ध मिरारोड पो ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३, ४, ५ सह गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी डॉ महेश पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री अमोल मांडवे सहा पोलीस आयुक्त गुन्हे मीरा भाईदंर वसई विरार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो निरीक्षक संपतराव पाटील, सहा. पोलिस उपनिरीक्षक उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो. हवालदार सम्राट गावडे, महिला पो हवालदार वैष्णवी यंबर, सुप्रिया तिवले, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष यांनी पार केली.