प्रिये तूच माझी

प्रिये तूच माझी

तू माझ्या मनातली,

तू माझ्या हृदयातील,

भावना जाणून घेणारी,

तू एकमेव!!

तुझ्याशी मी कधीच   

प्रतारणा करू शकत

नाही ग....

मला एकांतात प्रियसीची 

साथ देणारी कधी दुःख,

तर कधी सुख, तर कधी

नुसतीच खोडकर पणे

माझी खोडी काढून 

खळखळून हासणारी...

तुझ्यात ना माझं देहभान

 सगळं विसरून जातो..

आणि तुझ्यात एकरूप होतो

तू सोबत असलीस ना! तर

कधीच मला एकांत 

जाणवत नाही..

तू मला पूर्ण ओळखतेस,

मला समजून घेतेस,

किती सर्वस्वी माझी होऊन

समर्पण करते मला 

खुश ठेवण्यासाठी..

तुझ्या मुळेच मनात प्रेमाचे 

इंद्रधनू पसरतात...

मला जे बोलयाच असते ना, तुझ्या प्रेमा बद्धल

ते तू बरोबर हेरतेस..

तू देणाऱ्या जीवनाच्या एकनिष्ठ  साथी बद्दल..

तुझ्यात तू मला पूर्ण सामावून घेतेस अगदी..

जणू एकच श्वास दोघांचा,..

हृदय स्पर्शाने दररोज माझं गोड चुंबन घेणारी,

तूच  तूच माझी 

माझ्या जीवनाची सोबतीण

माझ्या आत्मिक  शब्दांची..

जिला मी प्रेमाने 

कविता बोलतो????

प्रीती तिवारी .


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी