
शिवीगाळ करून केला खुनाचा प्रयत्न !!
आजकाल कुणाशी वाद घालायला नको, अथवा भांडण करून शिवीगाळ ही करायला नको ! माणसं कोणत्या प्रकारे कसा बदला घेण्याचा प्रयत्न करतील याचा नेम नाही.
दिनांक ३ एप्रिल रोजी २०:१० वाजताच्या सुमारास फिर्यादी सत्यजित मनोहर धुरी, वय ४८ वर्ष राहणार रूम नंबर ०६ ए, ब्लॉक सर जे. जे. रुग्णालय कंपाउंड, सर जे जे मार्ग, मुंबई. हे सर जे.जे.रुग्णालय, गेट क्रमांक ०२ समोर, रामचंद्र भट्ट मार्ग या ठिकाणी असताना यातील अटक आरोपी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून, फिर्यादी यांना शिवीगाळी व धमकी देऊन फिर्यादी गेट मधून बाहेर येताच. आरोपिताने चाकूने खाद्यांवर वार केले तसेच जीवे ठार मारण्याचा उद्देशाने डोक्यावर तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले. म्हणून फिर्यादी यांनी ४ एप्रिल ०२२ रोजी दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा रजि. क्रमांक २२ कलम ३०७,३२४,५०४,५०६ भारतीय दंड विधान कलम ४२५ भा.हत्यार कायदा कलम ३७ (०१) (अ) १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.