वृद्ध तृतीयपंथीयाचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपितांना ठोकल्या बेड्या !!

वृद्ध तृतीयपंथीयाचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपितांना ठोकल्या बेड्या !!

        वसई तालुका जिल्हा पालघर तुळींज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १/४/२२ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तृयीयपंथी फिर्यादीच्या घरी आलेला इसम आया (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याने फिर्यादी झोपलेली असताना, तिच्या गळ्याला साडी गुंडाळली व त्यांनतर फिर्यादीस जाग आली असता त्या प्रतिकार करू लागल्या तेव्हा  सदर इसमाने तिच्या तोंडात साडी कोंबली. तसेच साडी हाताला गुंडाळून तिला पलंगाला बांधले व पलंगाजवळ फिर्यादीचे एकूण ९,१७०००/- किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली लाल रंगाची पर्स  जबरीने चोरी करून पळून गेला. 

        सदर गुन्ह्या बाबत फिर्यादी हिने तुळींज पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. यावरून भारतीय दंड विधान कलम ३९४ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक पद्धतीने व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती व  तपासावरून नमूद गुन्ह्यातील आरोपी आयान रिझवान शेख, रा. फिरस्ता, मूळ राहणार शिमोलताला, पोस्ट मालदा, जिल्हा मुशिंदाबाद, कोलकत्ता, राज्य पश्चिम बंगाल यास शिताफीने अटक करून त्याच्या कडुन  ७,२१,०५० रुपये किमतीचे २४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ८८,५००/- रुपये रोख रक्कम एक सॅमसंग मोबाईल, असा एकूण ८,१०,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

        तसेच इतर दोन गुन्ह्यातील पाचहजार किमतीचे भारत गैस चे दोन सिलेंडर  व ६७०, रुपये किमतीची सिगारेट पाकीट, असा एकूण ८.,१६,१७० रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपितांकडुन हस्तगत करण्यात आला.

        सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. संजय कुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आंनद मोरे, पोलीस शिपाई अशपाक जमादार, सुखराम गडाक, इस्माईल छपरीबन, विनायक राऊत यांनी यशस्वी केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week