८८ ग्रॅम वजनाचा एम डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या सराईत आरोपिंतास अटक!

८८ ग्रॅम वजनाचा एम डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या सराईत आरोपिंतास अटक!

      मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अधिकारी यांना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, नालासोपारा पश्चिम, हनुमान नगर येथे एक इसम त्याच्या राहत्या घरी तेथील परिसरात, मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे, सदर मिळालेल्या बातमी प्रमाणे दिनांक १५ एप्रिल ०२२ रोजी सापळा रचून कारवाई केली असता, एहेतेशाम मोहम्मद रफिक अन्सारी राहणार स्काय हाईट्स अपार्टमेंट हनुमान नगर, नालासोपारा, मुस्ताक मोहमद सईद खान राहणार साईसिटी अपार्टमेंट, हनुमाननगर नालासोपारा प. व मोहम्मद नबी उस्मान कुरेशी याच्या कब्ज्यात एकूण ६० ग्रॅम १८ ग्रॅम व १० ग्रॅम असा एकूण ८८ ग्रॅम वजनाचा ७,०४,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रोन सापडला असून नमूद अंमली पदार्थ त्यांच्या कडून जप्त करण्यात आला आहे. ह्यातील सराईत आरोपी एतेहाश मोहम्मद रफिक अन्सारी ह्याच्यावर अगोदर दोन गुन्हे नालासोपारा पोलीस ठाण्यात नोंद आहेत. संपूर्ण कारवाई दरम्यान एकूण ७,६७,३००/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.

       अटक केलेल्या आरोपिंवर अंमली पदार्थ विरोधी कायदा ८ (क) २१, २९ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

       सदरची कारवाई डॉ महेश पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री अमोल मांडवे सहा. पो. आयुक्त गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री देवीदास हंडोरे, स. पो. निरीक्षक धनाजी विलास कुंटे, पो. हवालदार धनाजी इंगळे, पवन पाटील, प्रदीप टक्के, अजय सपकाळ, विष्णू घरबुडे, सुभाष आव्हाड, पोलीस शिपाई अजय यादव यांनी केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week