डंपर ने दुचाकी मेस्ट्रोला दिली धडक, दुचाकीचा चालक जागीच ठार !

डंपर ने दुचाकी मेस्ट्रोला दिली धडक, दुचाकीचा चालक जागीच ठार !

        दिनांक १६ एप्रिल ०२२ रोजी १०:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी श्री सतीश जवाहर प्रसाद कसेरा वय वर्ष ३२ याचे भाऊ रविकुमार हे दुचाकीं मेस्ट्रो क्र. MH 47 AA 9659 ने भोर जंक्शन पश्चिम द्रुतदाती महामार्ग, दक्षिण वहिनी, ठाकूर व्हिलेज कांदिवली (पु). मुंबई या ठिकाणाहून जात असताना यातील मोटार डंपर क्र. M.48 MH AY 5060 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवत असताना राविकुमार यांच्या दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात राविकुमार हे जबर जखमी झाले. राविकुमार यांना कोणतीही वैद्यकीय मदत न देता अथवा पोलिसांना न कळविता डंपर चालकाने काढता पाय घेतला. काहीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने रवी कुमार याचा जागीच मृत्यु झाला. 

         फिर्यादी यांनी दिनांक १७ एप्रिल रोजी समता नगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा रजि क्रमांक ३४५ कलम ३०४ (अ), २७९ भारतीय दंड विधान सह १३४ (अ), (ब)  मोटार वाहन कायदा अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week