सोन्याचे दागिने घडविणाऱ्या दुकानातुन चोरी करून पळून जाणारऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या, ०५,१०,०००/- रुपयाचे दागिने हस्तगत !!

सोन्याचे दागिने घडविणाऱ्या दुकानातुन चोरी करून पळून जाणारऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या, ०५,१०,०००/- रुपयाचे दागिने हस्तगत !!

     दिनांक १५ एप्रिल रोजी तक्रारदार श्री. जंटु चित्तरंजन घोष, वय ४० वर्ष यांनी नवघर पोलीस ठाण्यात येऊन कळविले की, त्यांचा अशोक शॉपिंग सेंटर भाईंदर पूर्व येथे सोन्याचे दागिन्याचे डीझाईन करण्याचा गाळा आहे. सदर ठिकाणी काम करणारा कारागीर प्रबिर सामंता हा ०५,१०,०००/-किमतीचे १७० ग्रॅम वजनाचे सोने रिंग चोरी करून पळून गेला आहे. दिलेल्या तक्रारी वरून नवघर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ३८१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

          सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी पोलीस अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुन्ह्याच्या तपासात आरोपींची काही एक माहिती मिळून आली नसताना, गुन्हे प्रकटीकरण पथकाने माहिती काढून सी सी टीव्ही केमेरे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गुन्ह्यातील आरोपी प्रबीर जयदेव सामंता मूळ राहणार हावडा, पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास ग्रांट रोड मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपींकडुन पोलीस कस्टडी दरम्यान ०५,०६,८५०/- रुपये किमतीचे १६८.९५ ग्रॅम वजनाचे सोने  हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.

          सदर ची कामगिरी श्री.अमित काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ -०१, डॉ श्री शशिकांत भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त  नवघर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक प्रकाश  मासाळ (गुन्हे), सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित लांडे, पोलीस हवालदार भूषण पाटील, पोलिस नाईक गणेश जावळे, पोलीस शिपाई सुरज घुनावत, पोलीस शिपाई ओमकार यादव, पोलीस शिपाई विनोद जाधव यांनी केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week