
इझी मनी कमाके दुनिया पे करेंगे राज ! एटीम मशीन मध्ये स्कीमर बसवून एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश !
इझी मनी कमाके दुनिया पे करेंगे राज ! एटीम मशीन मध्ये स्कीमर बसवून एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश !
करोनाच्या महामारीत बरेच जण बेरोजगार झाले, घर चालवणं मुश्किल होऊन गेल. त्यातूनच आजकाल चे तरुण अंग मेहनतीचं काम न करता इझी मनी प्राप्त करण्यासाठी चोरी घरफोडी, सायबर गुन्ह्या कडे वळले.
त्यातल्या त्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. फसवणूक, एटीम मधून पैसे काढणे असे सायबर गुन्हे वारंवार घडत आहेत. असाच एक गुन्हा माणिकपूर(वसई) पोलीस ठाणे यांनी उघडकीस आणला, दिनांक ३० एप्रिल ०२२ रोजी एक सराईत संषयित इसम स्किमर मशीन घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटिकरण पथकाचे अंमलदार यांना मिळाली. त्या अनुषंगाने सदर पथकाने सापळा रचून संशयित आरोपी. सौरभ उज्वलकुमार यादव, रा. एकता सो.पाचपायरी गेट, जीवदानी रोड, विरार पूर्व, तालुका वसई, जि. पालघर. मूळ राहणार मायबिघा, पोस्ट किनारचट्टी, वझीरगंज, ठाणे, जि. गया, राज्य बिहार. यास ताब्यात घेऊन त्याच्याकडुन एक स्किमर जप्त केले. त्याच्याकडुन सखोल चौकशी केली असता त्याचे इतर साथीदार धनराज केसी पासवान, मूळ ग्राम धुंदु ,पो. गुरपा, थाना फतेपुर, जि. गया, बिहार, तिसरा आरोपी पवनकुमार अखिलेश पासवान, ग्राम नवखाप, पोस्ट घिवर, थाना फतेपुर, जि. गया, बिहार, राकेश कारू चौधरी, रा. ग्राम भवानी खुर्द, पो हेमतपुर, थाना फतेपुर, जि. गया, बिहार यांना ताब्यात घेण्यात आले सदर इसमांकडून कसून चौकशी केली असता विविध बॅंकांच्या एटीम मशीन, हॉटेल मधील वेटर्स, पेट्रोल पंपा वरील कामगार, यांना हाताशी धरून स्किमर मशीन मध्ये एटीएम कार्ड स्वाईप करून त्या आधारे बॅंक खाते दाराची माहिती प्राप्त करून एटीएम मशीन मधून सर्वसामान्य जनतेच्या बॅंक खात्यातून पैसे काढून लोकांची, फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीं कडुन, तीन लॅपटॉप, चार एटीम कार्ड क्लॉनर, आठ एटीएम स्किमर मशीन, पाच मोबाईल, विविध बॅंकांचे १०३ एटीएम कार्ड, दोन नोटबुक, रोख रक्कम व एक मोटार सायकल असा एकूण ४,१४,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर गुन्ह्याबाबत माणिकपूर पोलीस ठाणे येथे, गुन्हा रजि. क्रमांक, १६०, कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भारतीय दंड विधान सह गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री संजयकुमार पाटील पो. उपायुक्त परिमंडळ २, श्री. प्रदीप गिरीधर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेश ओझा वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिकपूर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन सानप, पोलीस उप निरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस उप निरीक्षक रोहिणी डोके, पोलीस हवालदार शैलेश पाटील, पोलीस हवालदार शामेश चंदनशिवे, पोलीस हवालदार धंनजय चौधरी, पोलीस शिपाई गोपाळ कोळेकर, पोलीस शिपाई प्रवीण कांदे यांनी केली.