तु है मेरी किरन.... क..क.. किरन ! प्रेम संबंध असताना लग्नास दिला नकार म्हणून केला खुनाचा प्रयत्न!!

तु है मेरी किरन.... क..क.. किरन ! प्रेम संबंध असताना लग्नास दिला नकार म्हणून केला खुनाचा प्रयत्न!!

         एकतर्फा प्रेम किंवा प्रेम असुन सुद्धा लग्नास नकार देणे, कधी कधी जात आडवी येणे, अथवा मुलीच्या घरच्यांना मुलगा पसंद नसणे, अश्या कितीतरी कारणा वरून, प्रेमसंबंध तुटतात लग्न जुळली जात नाहीत. आणि घरच्यांच्या गाढवपणामूळे त्या मुलीला कधी कधी जीवास मुकावे लागते. किंवा अचानक झालेल्या जीवघेण्या हंमल्यास सामोरे जावे लागते. अशी कितीतरी  उदाहरणे डोळ्यांनी पाहिली आहेत. अशीच एक प्रेमप्रकरणातून घडलेली घटना वडाळा बरकत अली नाका येथे घडली.

             दिनांक ४ मे०२२ रोजी सकाळच्या वेळेस पीडित मुलगी वय वर्ष २५ ही कामावर जाण्यासाठी सकाळी पावणे अकराच्या सुमारास बरकतअली नाका बस स्टॉप येथे पायी येत होती रस्ता ओलांडताना अनिल उत्तम बाबर वय वर्ष ३१ ह्याने पाठीमागे येऊन सदर मुलीच्या पाठीवर अचानक चाकूने हमला केला. त्यावेळेस तिथे ड्युटीवर उपस्थित असलेले वडाळा पो. ठाण्याचे पोलीस शिपाई मयूर बंडू पाटील यांनी तात्काळ प्रसंगवधान राखून सदर मुलीचा जीव वाचवण्याकरिता आरोपीच्या दिशेने धावले व आरोपीस रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्यावर सुद्धा चाकूने हमला करून, त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली.

             परंतू पोलीस शिपाई मयूर बंडू पाटील यांनी साहसाने आरोपीस वेळीच अटकाव केल्यामुळे सदर मुलीचा प्राण वाचला. हल्ल्यात जखमी झालेल्या सदर मुलीस पोलीस शिपाई मयूर बंडू पाटील, महिला पोलीस शिपाई गिरीजा गुरव, पोलीस शिपाई पाटील महिला पोलीस शिपाई कासारकर यांनी पिडीत मुलीस तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हल्ला का झाला ? हा तपास करीत असताना असे आढळून आले की नमुद पीडित मुलीशी अनिल उत्तम बाबर यांच्याशी प्रेम संबंध होते. नमूद मुलीस अनिलच्या कुटुंबीयांनी अनिलसाठी लग्नाची मागणी घातली होती. मात्र मुलीच्या कुटुंबियांना मुलगा पसंद नसल्याने, त्यास नकार दिला होता.

             प्रेमसंबंध असताना मुलीच्या घरच्या मंडळींनी लग्नास नकार दिला म्हणून दोन्ही कुटुंबात वाद झालेले होते. ह्यातून आज रोजी ह्यातील आरोपी अनिल बाबर हा सदर मुलीकडे पुन्हा त्याच्या विवाहा बाबत विचारणा करण्या करीता तिचा पाठलाग करीत गेला व तिचा हात खेचला. त्यावेळी तिने त्याचा हात झटकला असता  त्याने तिच्या पाठीवर चाकूने वार केला.

             प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या जबाबा वरून वडाळा पोलीस ठाणे येथे कलम ३०७,३३२,३३३ भारतीय दंड विधान अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

             नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी तसेच रुग्णालयामध्ये मा.पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. विश्वास नांगरे पाटील, मा.अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई श्री.दिलीप सावंत, मा. पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ मुंबई श्रीमती गीता चव्हाण, मा.सहायक पोलीस आयुक्त वडाळा विभाग श्री. केशव शिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद जाधव यांनी भेट दिली असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

       तसेच सर्व वरिष्ठांनी पोलीस शिपाई पाटील यांनी प्रसंगवधान राखून सदर पीडित मुलीचा जीव वाचवला म्हणून त्यांची प्रशंसा केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week