
मेरे रंग मे रंगनेवाली.......
व्हिडीओ पार्लर मध्ये लागणारे अश्लील पॉर्न व्हिडीओ पाहून झाला विकृतो मेनिया ! अल्पवयीन मुली आणि महिलांवर बलात्कार!!
पॉर्न व्हिडीओ कुणाला नवीन नाही आहेत आणि काही वर्षांपासून पॉर्न व्हिडिओ पाहणं म्हणजे एक फॅड होऊन राहीले आहे. पूर्वी चित्रपटात एखाद्या चित्रपटात खून अथवा बलात्कार चा एखादा थोडा सीन असला तरी तो सिनेमा अँडलट सिनेमा म्हणून घोषित व्हायचा व वीस वर्षा खालील मुलांना सिनेमा गृहात एन्ट्री नसायची. कालांतराने व्हिडीओ पार्लर सुरू झाले. त्यामुळे मनासारखे हवे ते चित्रपट पाहायला मिळू लागले त्या चित्रपटात ब्लु फिल्म चा ही समावेश होता आणि आता तर इंटरनेटचा जमाना आहे. घर बसल्या मुव्ही आणि इतर काहीही घर बसल्या पाहू शकता त्यात तर आजकालची तरुण पिढी पॉर्न व्हिडिओचे जास्त शौकीन झाले आहेत. ह्यात १५,१६ वर्षाच्या मुलांपासून अगदी म्हातारे सुद्धा पॉर्न व्हिडीओचे दिवाने आहेत.
परंतु असे व्हिडीओ अल्पवयीन मुलांनी पाहणे व जर ते डोक्यात घुसले तर ती मूल नक्कीच आंबट शौकीन बनतात. सेक्स एन्जॉय करण हे जणू त्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग बनते. नवीन नवीन मुली, स्त्रिया यांच्या बरोबर मैत्री करणं आणि देहाचे चोचले पुरवणं चालू असत आणि आजकाल फेसबुक आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून मैत्री करून एक व्यक्ती एका वेळेस कितीतरी जणांबरोबर सेक्सच्या अश्लील वार्ता, कृत्य करीत असतात व भावना उद्दिप्पीत करीत असतात. मग अशात पॉर्न व्हिडीओ पाठवणं, स्वतःच्या देहाचे अश्लील नग्न फोटो पाठवणं, सर्रास चालू असत. मग अशा वेळी भावना उदीपित झाल्या नंतर अशी व्यक्ती कितीतरी मुली स्त्रियां बरोबर सेक्स करण्यास तयार होतात.
पण कधी संभोगासाठी व्यक्ती उपलब्ध न झाल्याने काही विकृत माणसं स्त्रिया आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास कमी करीत नाहीत. ही खूप गंभीर बाब असुन आये दिन कुठे ना कुठे बलात्कार घडत असतात. अशा नालायक वृत्तीची माणसे समाजाला लागलेली कीड आहे. जी मुळापासून उपटून टाकली पाहिजे.
असाच एक पॉर्न व्हीडियो पाहून विकृत झालेला व सवयीने महिला व अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा नराधम याला काशीमीरा युनिट १ ह्या पोलीस ठण्याने जेरबंद केलं. दिनांक १८/४/०२२ रोजी एका अल्पवयीन (०९ वर्षे) मुलीसोबत केलेल्या गैरकृत्याबाबत नयानागर पोलीस पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. कलम ३७६ सह ८ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीसोबत सदरचा गुन्हा घडल्याने स्थानिक लोकांमध्ये असंतोष, व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीताकडून अश्या प्रकारे गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये व जनमाणसात सुरक्षिततेची भावना कायम राहावी हे अत्यंत महत्वाचे असल्याने आरोपितास लवकरात लवकर अटक करणे आवश्यक होते.
त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट १ काशीमीराचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन येणाऱ्या जाणाऱ्या मार्गाची पाहणी करून माहिती घेतली असता, आरोपी हा घटनास्थळी येताना नालासोपारा येथुन ट्रेनने मिरारोड येथे असल्याचे समजले. तसेच घटने नंतर सदर आरोपी हा मिरारोड येथून मुंबई येथे गेल्याचे समजले. प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी कल्पेश गोपीनाथ देवधरे वय वर्ष ३० व्यवसाय ड्रायव्हर, रा.कांदिवली (प) याला नालासोपारा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
आरोपी कल्पेश गोपीनाथ देवधरे ह्याच्या कडे तपास केला असता तो १६/१७ वर्षांचा असताना व्हिडीओ पार्लर मध्ये लागणारे अश्लील सिनेमा, पॉर्न व्हिडीओ पाहून अल्पवयीन मुली व महिला बघितल्यास त्याच्या मनामध्ये विकृत भावना निर्माण होऊन अशा प्रकारचे गुन्हे करण्याची सवय लागली, अशी माहिती मिळाली आहे. नमुद आरोपी कल्पेश देवधरे ह्याच्या संदर्भात माहिती घेता त्याच्या विरुद्ध कांदिवली पोलीस ठाणे सन २०११ भारतीय दंड विधान कलम ५०९. दिंडोशी पोलीस ठाणे सन २०१२, कलम ३६५, ५०९,५०६. पंतसगर पोलीस ठाणे मुंबई ९०/२०१२, कलम ३५४, ३६३. गोरेगाव पोलीस ठाणे सन २०१३ मुंबई कलम ५०९. चुनभट्टी पोलीस ठाणे मुंबई सन २०१४ भारतीय दंड विधान कलम ३५४(अ). पार्क साईट पोलीस ठाणे मुंबई ९८/२०१२, कस्तुरबा पोलीस ठाणे २२९/२०१५. मुंबई बांगुर नगर पोलीस ठाणे सन २०१६ कलम ३५४, (अ) (आय) ५०९, पवई पोलीस ठाणे सन २०१६ कलम ३५४, माणिकपूर पोलीस ठाणे वसई सन २०१७ कलम ३५४, १९२. पार्क साईट पोलीस ठाणे २०१७ कलम ५०९. गोवंडी पोलीस ठाणे मुंबई सन २०१७ कलम ३५४. डी. एन. नगर पो.ठाणे २०१८ कलम ३६३,५०६,५११. सायन पो.ठाणे सन २०१८ पोक्सो कलम १२. विलेपार्ले पोलीस ठाणे मुंबई ४८३/२०२० कलम ५०९. दिंडोशी पोलीस ठाणे सन २०२० कलम ३५४. दिंडोशी पो. ठाणे सन २०२० कलम ३५४ (ड),३६३. कुरार पोलीस ठाणे मुंबई भारतीय दंड विधान कलम ३५४ असे एकूण अठरा गुन्हे उघडकीस आले आहेत.
तसेच नमूद आरोपी याने दादर सेंट्रल पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ८४९/२०२१ भा.द.वि.कलम ३५४ अनव्ये गुन्हा केल्याची माहिती मिळाली असून सदर गुन्ह्यात तो पोलिसांना हवा असलेला आरोपी असल्याचे समजले आहे.
सदरची कामगिरी डॉ महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री.अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ काशीमीरा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, सहायक पोलिस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उप निरीक्षक हितेंद्र विचारे, सहायक पोलिस उप निरीक्षक राजेंद्र वेदपाठक, स.पो.उ.नि.राजू तांबे, किशोर वाडीले, अर्जुन जाधव, संदीप शिंदे, पोलीस हवालदार संजय शिंदे, अविनाश गर्जे, मुस्तकीन पठाण, पुष्पेद्र थापा, संतोष लांडगे, सचिन सावंत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, विकास राजपूत व सुमित जाधव यांनी यशस्वी केली आहे.